पोटावरून २७६ किलोंच्‍या १२१ दुचाकी… पंडित धायगुडेंनी दुसऱ्यांदा रचले ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

0
1

प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात काहीतरी मिळवायचं असतं, काहीतरी साध्य करायचं असतं. त्यासाठी त्याची धडपड, प्रयत्न सुरू असतात. जे आयुष्यात काहीतरी मिळवणं, प्राप्त करणं असतं, ते त्या व्यक्तीचं ध्येय असतं. असंच ध्येय उराशी बाळगत पंडित धायगुडे यांनी स्वतःचाच विश्वविक्रम मोडीत काढत पुन्हा दुसरा विश्वविक्रम रचला. याची नुकतीच ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने नोंद केली असून जतच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

पंडित धायगुडे यांनी आपल्याच नावावर असलेले १२१ वाहने पोटावरून चालविण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडून काढला. त्यांनी पुन्हा २७६ किलोच्या गाड्या ३७६ वेळा पोटावर चालवून आणखी विश्वविक्रम केला आहे. पंडित यांचा जन्म जत तालुक्यातील कंठी येथील धायगुडे वस्तीत झाला. आई-वडील आणि तीन भावंडे, पत्नी, मुलं असा परिवार. गरिबीचे चटके सोसतच त्यांचे बालपण गेले. आई – वडिलांसमवेत दुसऱ्यांच्या शेतात राबत दिवस काढले. जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक व दहावीपर्यंतचे शिक्षण जतमध्ये पूर्ण केले.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

पंडित यांना लहानपणापासूनच खेळाची आवड होती. नोकरीसाठी त्यांनी मामामसमवेत मुंबई गाठली. मुंबईमध्ये आल्यावरही खेळाची आवड टिकवून ठेवली. मुंबईतील देवनार बकरी मंडीमध्ये काम करत करता फावल्या वेळेत कराटे प्रशिक्षण घेतले. सर्व अडचणींवर मात करत त्यांनी राष्ट्रीय स्तरावर दोन पदके मिळवली. त्यानंतर ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००३ मध्ये त्यांची शिपाईपदी नियुक्ती झाली.

नोकरीची भ्रांत मिटली असली तरी आपण देखील काहीतरी वेगळे करून दाखवले पाहिजे, असा निर्धार करून त्यांनी सराव सुरू ठेवला. विविध स्पर्धांमधून पाच, दहा व २१ किलोमीटर धावणे सुरूच ठेवले. इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करायचे, यातूनच वजनदार दुचाकी अधिकाधिक वेळा पोटावरून नेण्याच्या प्रकाराचा पंडित धायगुडे यांनी सराव घेतली.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

याच मेहनतीचे फळ म्हणजे २८ ऑगस्ट २०१६ मध्ये २५७ किलो वजनाच्या दोन दुचाकी लागोपाठ १२१ वेळा आपल्या पोटावरून जाऊ देत त्यांनी विश्वविक्रमाला गवसणी घातली व ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदवले. त्यानंतर ७ मे २०२३ मध्ये २७६ किलो वजनांची वाहने ३७६ वेळा पोटावर चालवून विश्वविक्रम केला. या नव्या विक्रमाची नुकतीच ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे.

विद्यार्थ्यांना देताहेत स्वसंरक्षणाचे धडे

शिक्षणासमवेत क्रीडाक्षेत्रातही आपलं नैपुण्य असणं भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, हे पंडित धायगुडे जाणलं, अनुभवलं. यासाठी २००० पासून शाळेतील विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे, तसेच कराटेचे प्रशिक्षण देण्याचे काम करत आहेत. युवा पिढीला; खासकरून युवतींना एकटे वावरत असताना छेड काढणाऱ्याविरोधात आत्मसंरक्षण करता यावे.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

शिवाय, युवापिढी व्यसनांपासून दूर राहावी, यासाठी वेळोवेळी त्यांना प्रबोधन करण्याचे काम निःस्वार्थ भावनेने पंडित धायगुडे हे करत आहेत. त्यांनी ही देखील आवड जोपासल्याचे निदर्शनास आले. भविष्यात सतत प्रयत्न करून आताच्या युवापिढीला आत्मपरीक्षणाचे धडे देण्याचे कार्य करायचे आहे. त्याचबरोबर युवापिढी व्यसनापासून दूर कशी राहील. यासाठी मी प्रयत्नशील राहीन.

– पंडित धायगुडे