शिवसेना आमदार अपात्रता वेगळा ट्विस्ट निर्णयाविरोधाची याचिकेची सुनावणीही पुन्हा पुढे; 14मेला हे ही स्पष्ट होणार

0

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी 14 मे रोजी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी उद्याची 26 एप्रिल ही तारीख निश्चित केली होती. मात्र आता ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे गटाचे आमदार अपात्र केले नाहीत म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने नार्वेकरांनी आमदार अपात्र प्रकरणी दिलेल्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. तर या प्रकरणी शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात होणार की मुंबई उच्च न्यायालयात? हे देखील 14 मे ला स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

नेमकं काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर स्वतःचा शिवसेनेचा गट अधिकृत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर शिवसेना कोणाची यावर कायदेशीर खल सुरू झाला होता. सर्वोच्च न्यायलयात हे प्रकरण पोहोचल्यानंतर न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्र प्रकरणी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. अपात्र प्रकरणात 10 जानेवारी रोजी निकाल जाहीर झाला. यावेळी खरी शिवसेना शिंदे गटाची असल्याचं सांगण्यात आलं होतं.

तसंच या निकालात एकनाथ शिंदे गटाचे आमदार अपात्र करण्यात आले नव्हते. त्यामुळे कायद्यानुसार शिंदेंचे आमदार अपात्र आहेत असा दावा ठाकरे गटाने करत नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर त्यांनी आक्षेप घेतला होता. शिवाय त्यांनी नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. तर तर या प्रकरणी शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात होणार की मुंबई उच्च न्यायालयात? हे पुढील सुनावणीत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन