इंडिया अगेंस्ट करप्शनचे हेमंत पाटील यांनी क्रिकेटरच्या वेशात भरला लोकसभेचा फॉर्म

0

पुणे : इंडिया अगेंस्ट कराप्शनचे हेमंत पाटील यांनी आज पुणे लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला. खेळाडूंचे प्रश्न मांडण्याच्या उद्देशाने यावेळी हेमंत पाटील यांचे कार्यकर्ते क्रिकेटरच्या वेशात त्यांच्या समवेत लोकसभेचा फॉर्म भरण्यासाठी आले होते.

यावेळी माध्यमांशी बोलताना हेमंत पाटील म्हणाले, मागील 75 वर्षात भाजप किंवा काँग्रेस या दोन्ही पक्षांनी भारतीयांसाठी काहीही केले नाही. आजही बेरोजगारी, उपासमारी, महागाई हे प्रश्न आहेतच. या प्रश्नांच्यामध्ये खेळाडूंच्या प्रश्नांकडे तर कोणी लक्षच देत नाही. त्यामुळे खेळाडूंचे प्रश्न मांडण्यासाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडून आल्यास विविध खेळ आणि खेलांडूंचे प्रश्न मार्गी लावण्याचा आपला निर्धार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच मतदारांनी उमेदवार कसा आहे ? त्याचे चरित्र स्वच्छ आहे की नाही?, हे पाहावे असे आवाहन देखील हेमंत पाटील यांनी यावेळी केले.
दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, माहायुतीच्या वतीने मुरलीधर मोहोळ आणि वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने वसंत मोरे यांचे आव्हान आता हेमंत पाटील यांच्या समोर असणार आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती