मतमोजणीपूर्वीच भाजपने खाते उघडले, आतापर्यंत निवडणुकांमध्ये किती खासदार झाले बिनविरोध

0

लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान संपले अन् दुसऱ्या टप्पाचा प्रचार उद्या २४ एप्रिल रोजी थांबणार आहे. सात टप्प्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी चांगली बातमी आली आहे. या निवडणुकीत भाजपचे खाते मतमोजणीपूर्वीच उघडले आहे. सुरतमध्ये भाजप उमेदवाराचा बिनविरोध विजय झाला आहे. २०१२ नंतर बिनविरोध झालेले ते पाहिले उमेदवार ठरले आहेत. १९५१ पासून आतापर्यंत देशात ३५ खासदार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात यशवंतराव चव्हाण यांचाही समावेश आहे. दरम्यान, सुरतमधील मुकेश दलाल यांच्या बिनविरोध विजयानंतर काँग्रेसने ही मॅच फिक्सिंग असल्याचे म्हटले आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

नेमके काय घडले

गुजरातमध्ये २६ जागांसाठी मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्यात ७ मे रोजी मतदान होणार असून त्यासाठी अर्ज माघारी घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. सुरतमधील बसपाचे प्यारेलाल भारती, तीन छोटे पक्ष आणि चार अपक्षांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यापूर्वी छाननीमध्ये काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभाणी यांच्या अर्जावर सूचकांच्या स्वाक्षरी बनावट आढळल्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. कुंभाणी यांच्याऐवजी डमी उमेदवार असणाऱ्या सुरेश पडसाला यांचा अर्जही बाद झाला. त्यामुळे भाजपचे मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले.

काँग्रेसचा मॅच फिक्सिंगचा आरोप

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ पारधी यांनी दलाल यांना विजयी घोषीत केले. त्यानंतर काँग्रेस आक्रमक झाले आहे. सुरतमधील जनभावनेच्या रोषाला घाबरुन भाजपने मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केले. भाजपच्या सांगण्यावरुन हा अर्ज बाद केल्याचा आरोप काँग्रेसने केला. या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

आतापर्यंत ३५ खासदार झाले बिनविरोध

१९५१ मधील पहिल्या निवडणुकीत पाच खासदार बिनविरोध
१९५७ मध्ये ७ खासदार बिनविरोध
१९६२ मध्ये ३ खासदार बिनविरोध
१९६७ मध्ये ५ खासदार बिनविरोध
१९७१ मध्ये, १९८० आणि १९८९ मध्ये एक, एक खासदार बिनविरोध
१९७७ मध्ये २ खासदार बिनविरोध
लोकसभेसोबत सुरु असलेल्या अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे दहा आमदार बिनविरोध निवडून आले आहेत.