भाजपकडून मतदान केंद्रावर ‘अजब’ पक्षपात; प्रतिभा धानोरकरांच्या नावासमोर ‘कॅन्सल’चा शिक्का

0

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील आज पहिल्या दिवशी चंद्रपुरातील एका मतदान केंद्रावर राडा झाला. मतदान केंद्रावर काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या नावासमोर कॅन्सलचा शिक्का मारल्याची गोष्ट समोर आल्याने मतदान केंद्रावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राडा केला.

चंद्रपूर येथील हिंदी सिटी हायस्कूलमधील मतदान केंद्रावर सकाळी मतदानासाठी गेलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रावर उमेदवारांच्या लावलेल्या यादीवर काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या नावापुढे कॅन्सल असा शिक्का मारण्यात आल्याचे आढळले. त्यांनी तेथील बूथ कर्मचारी आणि इतरांना याचा जाब विचारत चांगलाच राडा घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत भाजपकडून पक्षपात केला जात असल्याचा आरोप केला.

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?