‘बिचाऱ्या अंबादास दानवेंना त्रास…”, BJP प्रवेशाच्या चर्चांवर फडणवीसांचे हे उत्तर अन् मविआचीही खिल्ली

0

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळाली नसल्याने विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यातूनच आज सकाळापासूनच दानवे भापजमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठवल्या गेल्या होत्या. यावर दानवेंनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांवर नाराजी व्यक्त करत कारदेशीर कारवाई करणार असल्याची भूमिका घेतली होती. या सर्व घडामोडीवर आता उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लातूरमध्ये काँग्रेसचे बडे नेते शिवराज चाकूरकर यांच्या सून अर्चना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. अंबादास दानवे, आमदार अमित देशमूख भापजात प्रवेश करणार का? असा सवाल पत्रकारांनी फडणवीसांना विचारला होता. का बिचाऱ्या अंबादास दानवेंना इतका त्रास देताय ? असा प्रतिसवाल त्यांनी माध्यमांना केला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, लातूरचे आमदार अमित देशमूख माझ्या संपर्कात नाही आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाची कोणतीच चर्चा नाही नाही. मला असं वाटतं माझा विरोधी जरी असला तरी उगाचंच संशयाच्या भोवऱ्यात आणण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  अजितदादांची ही खेळी पुणेरी राजकारणात मोठी उलथापालथ; 3 पक्षात वादाचा भडका आणि भाजपाची ही गणिते बिघडली आत्ता दुरंगी लढती शक्य

महाराष्ट्र काँग्रेसला हायकमांड करून मैत्रिपुर्ण लढतीस परवानगी मिळाली आहे. यावर बोलताना फडणवीसांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. महाविकास आघाडी असो किंवा इंडिया आघाडी यांच्यात फ्रेंडली फाईटच आहे. हे फ्रेंड म्हणून एकत्र बसतात नंतर फाईट करून जातात. त्यामुळे चार महिन्यापासून फ्रेंडली फाईटच सुरू आहे, असा सणसणीत टोला लगावला.

मनसे सोबतच्या युतीवर बोलताना फडणवीस म्हणाले, मनसे सोबत बैठका झाल्या आहेत. पण अद्याप आमचा कोणताही निर्णय झालेला नाही. महायुतीच्या जागावाटपावर फडणवीस म्हणाले की, तुम्ही म्हणताय तर चार-पाच जागांवर आमचं अडलंय. एक जागा अडली की तीन जागा अडतायत. कारण ही यांची असेल तर ती त्यांची असते. पण आमचं जागावाटप फार अडलंय अशी परिस्थिती नाही आहे. थोडसं अडलंय, एक दोन दिवसात सुटेल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  अजित पवार गटातही नाराजीनाट्य; पुण्यातील बडा नेता राजीनामा देणार? 

अंबादास दानवे काय म्हणाले? 

लोकसभेची यादी जाहीर होईपर्यंत मी नक्कीच नाराज होतो. मला उमेदवारी मिळावी. यासाठी माझा प्रयत्न होता. पण ज्याक्षणी पक्षनेतृत्वाने निर्णय घेतला. त्याचवेळी माझी नाराजी संपूष्टात आली. मी आता जोमाने खैरेंचा प्रचार करणार, असे अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.