गुजरात कॉलनीत ‘लहान करू होळी, दान करू पोळी’चा संदेश देत होळीचा सण उत्साहात साजरा

0

कोथरूड मधील गुजरात कॉलनी येथे होळी पौर्णिमा चा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या 30 वर्षे पासून येथे होळी चा सण साजरा करण्याची परंपरा असून गुजरात कॉलनी मधील ही मानाची होळी आहे, होळीच्या पवित्र अग्निमध्ये, निराशा, दारिद्र्य, आळस, द्वेष, यांचे दहन होवो, आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, समाधान आरोग्य अणि शांति नांदो. अशी प्रार्थना यावेळी होळीचे संयोजक प्रीतम मेहता यांनी केली.

होळी पर्यावरण पूरक होण्यासाठी लहान होळी करण्यात आली होती, त्यामुळे कमीतकमी वृक्षतोड होऊन पर्यावरणाची हानी कमी होण्यास मदत होणार आहे. होळी मध्ये पोळीचा नैवैद्य टाकल्याने तो जळून नष्ट होतो त्याऐवजी तो नैवेद्य गरीब लोकांना दिल्यास त्यांनाही आपल्या आनंदात सामावून घेता येईल म्हणून यावेळी “लहान करू होळी – दान करू पोळी” असा सामाजिक संदेश देण्यात आला. अशी माहिती संयोजक प्रीतम मेहता यांनी दिली. यावेळी गुजरात कॉलनी परिसरातील अनेक मान्यवर, नागरिक तसेच महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. नमो मेहता, प्रेम तोटे, हर्ष मेहता, आयुष मांढरे, मोरया सोनकर, युवराज खत्री, ओम मांढरे, प्रथमेश पेठे यांनी विशेष परिश्रम घेतले. होळीची संकल्पना-संयोजन सामाजिक कार्यकर्ते प्रितम मेहता आणि मित्रपरिवार यांनी केले होते.

अधिक वाचा  पुण्यात महायुतीची ताकद आणखी वाढली; पर्वती, खडकवासला, धायरी, वडगाव शेरीचे पदाधिकाऱ्यांचे पक्षांतर