लोकसभा चाहुल अन् महायुतीचे ‘अतिवेगवान’ पाऊल; 27 लोकप्रिय निर्णयाची मंत्रिमंडळ बैठक; घोषणांचाही पाऊस

0
2

या बैठकीत शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतानाच मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासोबतच पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड असे करण्याचा निर्णयालाही मंजुरी देण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कोणत्याही क्षणी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. तसेच आचारसंहितेची घोषणा होण्याची आहे. तत्पूर्वी शिंदे- फडणवीस-पवार सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 27 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनेक मंत्री उपस्थित होते.या बैठकीत शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतानाच मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासोबतच पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड असे करण्याचा निर्णयालाही मंजुरी देण्यात आली.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

तसेच अहमदनगरच्या अहिल्यादेवी नगर नामांतराला मान्यता देण्यात आली. महायुती सरकारने 27 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळाची ही बैठक झाली.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय :
मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर

पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला १५ हजार रुपये

अहमदनगर शहराचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास मान्यता

केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार. राज्याच्या १५३ कोटी हिश्श्याला मान्यता

श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार. अडीच एकर भूखंड घेणार

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य. ३२०० कोटींचा प्रकल्प

भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत ५० वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार. हजारो कर्मचाऱ्यांना लाभ

महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार. नफ्यात आणणार

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता. ३५ गावांना लाभ होणार

मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार. १२५ हेक्टर जमीन सिंचित करणार

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ. आता संस्थांना २५ हजार रुपये अनुदान.

मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले.

आयटीआय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार.

कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी ९०२० कोटी एआयआयबी बँकेकडून घेणार.

शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार ११ हजार ५८५ कोटींच्या प्रकल्पास मान्यता

पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना. प्रशासनात सुधारणा होणार

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता

म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणार. युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन

आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ

मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार

मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार. उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किलोमीटरचे रस्ते बांधणार. या वर्षात दहा हजार किमी रस्ते

भोगवटामूल्याची रक्कम कमी करणार

महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन

जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग. २४५३ कोटी राज्याच्या हिश्यास मान्यता

दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना