राज्यात सर्वाना वेध लागले आहेत ते म्हणजे २०२४ च्या निवडणुकीचे. आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष कंबत कसत आहेत. अशातच, राज्याचा मुख्यमंत्री कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. काही दिवासांपूर्वी, जयंत पाटील, अजित पवार यांचे बॅनर भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले होते.
तर शिंदे गटाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त लोकप्रिय आहेत. असा उल्लेख केला होता. यासर्वावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे.
एकीकडे भारतीय जनता पक्षानं पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच असणार अशी चर्चा रंगली आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात सर्व प्रश्नाची उत्तर दिली.
देवेंद्र फडणवीसांनी रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आगामी मुख्यमंत्री पदावर भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वगुणांविषयी ठाम भूमिका मांडणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याबाबत पक्षातील वरीष्ठ निर्णय घेतील, अशी भूमिका मांडली.
कोणत्याही पक्षाला आणि कार्यकर्त्याला हेच वाटत असतं की आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा. पण २०२४ ची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच आम्ही लढवू. जो मुख्यमंत्री असतो, तोच सरकारचा नेता असतो, त्याच्याच नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातात. असं फडणवीस यावेळी म्हणाले.