विविध अभिनयाच्या छटा आणि त्यातून उत्तम काम करणारी अभिनेत्री म्हणजे अपेक्षा पोरवाल ! अपेक्षा ने वैविध्य पूर्ण भूमिका करून आपल्या कामाची एक छाप पाडली आहे. तिने जाणीवपूर्वक असे प्रकल्प निवडले आहेत जे तिला एक अभिनेत्री म्हणून ओळख संपादन करून देतात.






अपेक्षाने अनदेखी मध्ये बंगाली आदिवासी मुलगी कोयल ही भूमिका साकारली या भूमिके साठी तिने पूर्णपणे डी-ग्लॅम होऊन ही भूमिका साकारली. या पात्रातील बारकावे करण्यासाठी अपेक्षा बंगाली शिकली.

दिल बेकरार मध्ये अपेक्षा ने 1980 च्या दशकात मुंबईतील तरुण पत्रकार मिताली पेडणेकरची भूमिका साकारून प्रेक्षकांना थक्क केले. मितालीची भूमिका सहजतेने करत असल्याने अपेक्षा तिच्या अभिनयाची प्रशंसा करते.
स्लेव्ह मार्केट या तिच्या नवीन प्रोजेक्ट मधून अपेक्षा ने अरबी मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी पहिली भारतीय बनून आपल्या देशाचा अभिमान वाढवला आहे. जिथे ती 1900 च्या दशकातील सुंदर राजकुमारी लावणीची भूमिका करणार आहे.
प्रत्येक पात्र साकारताना अपेक्षा ने मेहनत घेतली. एक कलाकार म्हणून विकसित होताना तिने प्रत्येक वेळी आपल्या भूमिका उत्तम रित्या पार पाडल्या. तिचे आगामी काळात अनेक नवीन प्रोजेक्ट येणार असल्याचं समजतंय. ज्यामध्ये स्लेव्ह मार्केटच्या दुसऱ्या सीझन येणार आहे तिच्या येणाऱ्या प्रोजेक्ट साठी सगळेच उत्सुक आहेत.











