टिंबर मार्केटमध्ये आग आटोक्यात नाहीच, ४० गाड्या आणि १४० जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरूच

0

भवानी पेठेतील टिंबरमार्केटमधील लाकडाची सात दुकाने जळून खाक झाली. पहाटे सव्वाचारच्या सुमारास आग लागली असून, अजूनही आग धूमसत आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करीत आहेत पुणे शहर, पुणे कॅन्टोमेंट, पीएमआरडीएच्या १८ गाड्या आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण समजू शकले नाही. ४ वा १४ मिनिटांनी कॉल आल्यावर अग्निशमन जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आगीने मोठे स्वरूप धारण केले होते. शेजारील शाळा व काही घरांना आग पसरू न देण्यासाठी तत्काळ गोडाऊन शेजारी असलेल्या घरातील सिलेंडर काढण्यात आली.

सुमारे आठ ते दहा दुकाने व चार घरे जळाली असून नुकसानीविषयी सांगता येणार नाही, आहे. यावेळी ४० गाड्या आणि १४० जवाना आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रसिद्धी प्रमुख नीलेश महाजन यांनी माहिती देताना सांगितले.

अधिक वाचा  भाजप-शिवसेना युती तुटण्याच्या स्थितीत! राजकीय भूकंपही शक्य? एकनाथ शिंदेंची किंमत फक्त १२ जागा

यावेळी मधुर ट्रेडर्स- राहुल संघवी,
वर्धमान एंटरप्रायजेस- प्रकाश मुथा, नतमल मुलाजी ओसवाल, अशोक ओसवाल,
नॅशनल टिंबर- नालचन ओसवाल,मनोज टिंबर्स- बाळासाहेब ओसवाल,
गुलाब टिंबर्स- गुलाब ओसवाल
यांची लाकडाची दुकाने जळून खाक झाली.

तसेच संतोष गायकवाड, हेमंत साबळे, रवी लडकत, दिलीप पांडे, दिनेश शेठ, सुदेश लडकत, गणेश लोणकर, विजू लडकत आदींचे आठ ते दहा घरांचे नुकसान झाले आहे. क्रिस्टल कर्विल अँड इंजिनिअरिंगचे सुमारे १५ ते १६ लाखांचे वुड अँड ग्राविंग लेझर कटिंग मशीन जळून खाक झाल्याचे व्यापारी आदित्य आहेर यांनी सांगितले. टिंबर मार्केटच्या पाठीमागील बाजूस महापालिकेची रफी अहमद किडवाई उर्दू शाळेतील आठ-दहा वर्ग खोल्या जळाल्याची माहिती नागरिकांनी दिली.

दरम्यान, शाळेतील दप्तर जळून खाक झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. या शाळेतील पालक-विद्यार्थ्यांनी हळहळ व्यक्त केली. टिंबर मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष रतनशेठ किराड म्हणाले की, टिंबर मार्केट मधून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतो. मात्र कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा मार्केटला दिला जात नाही. अशा घटनांप्रसंगी व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते.

अधिक वाचा  भाजपच्या पुणे ‘सर्जिकल स्ट्राईक’ नंतर कोअर कमिटीत 100 नावांवर एकमत ; आधी आपला बाब्या अन् नंतर….?

गुरुवार असल्याने पाणी नाही, पाण्याचा दाब कमी असल्याने आग विझविण्यात मोठी अडचण आली. मागिल अनेक वर्षांपासून वाढीव टिंबर मार्केटसाठी जादा देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. अद्याप ही समस्या सुटलेली नाही. संजय भोसले म्हणाले की, दुकानांमध्ये फायर ऑडिटची सुविधा नाही. शाळेमध्येही तीच अवस्था आहे. दिवसा आग लागली असती तर जीवितहानी झाली असती.

अग्निशमनचे वाहने येण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी फायर ऑडिट करून आग लागणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. यावेळी स्थानिक सतीश तोडकर म्हणाले की, पहाटे ३:३० ते दरम्यान ही आग लागली. आम्हा सर्वांना ४ वाजता आगीची झळ आणि वास आल्यावर समजले. अग्निशमन कार्यालयात फोन वर न बोलता स्वतः अग्निशमन जवानांना आम्ही घटनास्थळी घेऊन आलो.

अधिक वाचा  EVM मध्ये नावाचा क्रम बदलला, पक्षांची मक्तेदारी की सुलभता? पक्ष आणि उमेदवारांची अशी दिसणार नावं!

या जागेतील रेसिडेन्सी एरियाला कमर्शिअल स्वरूप देण्यात आले आहे. अनेकांनी स्वतची राहती घरे विकून दुकानदारांना विकली. या व्यवसायामुळे अनेकदा या ठिकाणी आग लागण्याची दुर्गे दुर्घटना होत असते त्यामुळे येथील लाकडाचे दुकाने बंद करण्याची मागणी स्थानिक रहिवासी विजय निकम यांनी केली आहे.

रोज रात्री मध्यपी, नशा करणारे लोक गाड्यांचा आड बसून या ठिकाणी व्यसन करत बसतात. एकही सुविधा मार्केटला देण्यात आलेली नाही. सर्वात जास्त टॅक्स मार्केट मधून वसूल केला जातो. टिंबर मार्केट विषयी गांभीर्य नसल्याने आज या घटना घडत असल्याचे व्यापारी राकेश ओसवाल यांनी बोलताना सांगितले.