कर्नाटक कोणाचं पारडं जड कोणाला स्पष्ट बहुमत; प्रचार सांगतेला…, शेवटचे ओपिनियन पोल समोर

0

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राज्यात तीन प्रमुख पक्ष असले तरी या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आतापर्यंत काँग्रेस आणि भाजपामध्येच मुख्य चुरस दिसून येत आहे. एकीकडे काँग्रेसकडूनभाजपा सरकारचा भ्रष्टाचार आणि जातियवादाच्या मुद्द्यांवरून आक्रमक प्रचार सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपाने पंतप्रधान मोदींविरोधात खर्गेंनी केलेली टिप्पणी आणि बजरंग दलावर बंदी घालण्याचं काँग्रेसने दिलेलं आश्वासन यांना प्रमुख मुद्दा बनवलं आहे. दरम्यान, प्रचार संपायला आता काही अवधीच शिल्लक राहिला असताना कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीतील कल दर्शवणारे शेवटचे ओपिनियन पोल समोर आली आहेत.

सी-वोटरने केलेल्या या ओपिनियन पोलनुसार कर्नाटकमध्ये अखेरच्या क्षणी काँग्रेसने आघाडी घेतली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचं पारडं जड दिसत आहे. या ओपिनियन पोलनुसार २२४ जागा असलेल्या कर्नाटकच्या विधानसभेमध्ये काँग्रेसला ११० ते १२२ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. तर भाजपाला ७३ ते ८५ जागांवर समाधान मानावे लागू शकते. जेडीएसला २१ ते २९ आणि इतरांना २ ते ४ जागा मिळू शकतात.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

कर्नाटकमधील विभागवार आकडेवारी

ग्रेटर बंगळुरू ३२ जागा
काँग्रेसला १४ ते १८
भाजपाला १२ ते १६
जेडीएसला १ ते ४
इतरांना ० ते १ जागा मिळू शकते.

ओल्ड म्हैसूर भागात ५५ जागा
काँग्रेसला २४ ते २८
जेडीएसला १९ ते २३
भाजपाला ४ ते ८
इतरांना ० ते ३ जागा मिळू शकतात.

सेंट्रल कर्नाटक ३५ जागा
भाजपाला १० ते १४
काँग्रेसला २० ते २४
जेडीएसला ० ते २
इतर ० ते १

कोस्टल कर्नाटकमध्ये २१ जागा
भाजपाला १३ ते १७
काँग्रेसला ४ ते ८

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

हैदराबाद कर्नाटक ३१ जागा
भाजपा ६ ते १०
काँग्रेसला १८ ते २२
जेडीएसला ० ते २
इतर ० ते ३

मुंबई कर्नाटकमध्ये ५० जागा
काँग्रेसला २४ ते २८
भाजपाला २२ ते २६
जेडीएसला ० ते १
इतर ० ते १ जागा जाऊ शकते.