पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ,मार्ट आयोजित शेतकऱ्यांची कृषीपर्यटन कार्यशाळा

0

नुकतेच पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ,मार्ट आयोजित शेतकऱ्यांची कृषीपर्यटन कार्यशाळा संपन्न झाली, राज्यातील विदर्भ मराठवाडा कोकण,पश्चिम महाराष्ट्र विविध भागातून शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांबरोबरच ग्रामीण भागात युवक, पदवीधर, कृषी व ग्रामीण पर्यटनातील अभ्यासक इत्यादींनी सहभाग घेतला.पर्यटन संचालनालय उपसंचालिका सौ.सुप्रिया दातार करमरकर आणि मार्टचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन झाले ,याप्रसंगी मार्ट चे संचालक सचिव एडवोकेट विजयराव झोळ, अविनाश चव्हाण, संचालक विठ्ठल धनवडे, इंटेलकच्युअल फोरम ऑफ इंडियाचे श्री सतीश देशमुख याप्रसंगी उपस्थित होते.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

पर्यटन संचालनालय च्या उपसंचालिका सुप्रिया दातार यांनी कृषी पर्यटन बाबत कृषी पर्यटन 2020 नुसार कृषी पर्यटन केंद्राच्या नोंदणी बाबत प्रक्रिया शेतकऱ्यांना सांगितले नियमावली बाबत मार्गदर्शन केले.2011 मध्ये कृषी आणि ग्रामीण पर्यटनाला चालना देणारे सकारात्मक धोरण मसुदा मार्टने राज्य सरकारला सादर केला वेगवेगळ्या स्तरावर कृषी पर्यटन धोरण मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. पर्यटन विभागामार्फत पर्यटन केंद्रांच्या मार्केटिंग साठी भविष्यात मार्ट प्रयत्न करणार आहे, तसेच या व्यवसायाला इंटरेस्ट सबसिडी स्वरूपात अनुदान मिळण्यासाठी मार्ट प्रयत्न करत आहे मार्टचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांनी सांगितले.मार्टच्या संचालिका सौ सोनाली जाधव यांनी कृषी पर्यटनातील आदरातित्या विषयाची मांडणी करताना प्रत्यक्ष कृषी पर्यटन केंद्राची फेरी करून आणली.कृषी पर्यटनातील लँडस्केप व आराखडा हा विषय अतिशय हसत खेळत, विनोद करत श्री योगेश आपटे यांनी शेतकऱ्यांना मूळ कृषि संस्कृतीची ओळख करून दिली.कृषी पर्यटनाची यशोगाथा सादर करताना गप्पांगण कृषी पर्यटन केंद्रचे संचालक ऍड.ओंकार देशपांडे यांनी शेतकऱ्यांना कृषी पर्यटनातील अनेक गुपिते खुले केलि .
शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या रांगड्या भाषेमध्ये कृषी पर्यटनाचे महत्त्व योगाचार्य श्री अनंतराव झांबरे यांनी विशद केले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

कृषी पर्यटनाच्या अभ्यासक शितल गुगळे यांचेही मार्गदर्शन छान झाले.दिवसभराचा आढावा घेत संचालक सचिव ऍड.विजयराव झोळ यांनी कार्यक्रमात सर्वांचे आभार मानले.कृषी पर्यटन कार्यशाळेतील शेतकऱ्यांच्या एकंदरीत मार्ट कडून भविष्यात फार मोठ्या अपेक्षा आहेत. मार्टने मागील 14 वर्षात विधायक कार्य, संघटन आणि सत्यासाठी संघर्ष करीत कृषी पर्यटनाला एक वेगळी उंची प्राप्त केले आहे.

बाळासाहेब बबनराव बराटे
अध्यक्ष,मार्ट