पवार साहेब तुम्हांला राजीनामा देण्याचा अधिकार कोणी दिला… ; आव्हाडांनी शरद पवारांवर केला आरोप

0
1

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेतलं नाही, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागेल आहेत. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. लोकांना मनातील निर्णय घ्यावं, अशी विनंती जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.

आव्हाड यांच्यासह ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. तसेच ट्विट करत त्यांनी पवार साहेब तुम्हांला राजीनामा देण्याचा अधिकार कोणी दिला. असा सवाल उपस्थित केला आहे.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

काय म्हणाले आहेत आव्हाड ट्विटमध्ये?

पवार साहेब तुम्हांला राजीनामा देण्याचा अधिकार कोणी दिला. कुठलीही भूमिका घेताना ज्या बाजूने लोकहीत आहे त्याच बाजूने निर्णय झाला पाहिजे; कदाचित तो आपल्या मनाला पटला नाही तरी चालेल. पण लोकशाहीच्या विरोधात कुठलाही निर्णय जाता कामा नये असे तुम्ही आम्हांला सांगत आले. आणि आज कोणाचाही विचार न करता तुम्ही राजीनामा देऊन आम्हांला वाऱ्यावर सोडून निघून जात आहात.

या सगळ्या वादळ वाऱ्यांना आम्ही गेली अनेक वर्षे तोंड देत आहोत ते केवळ एकच शब्दामुळे शरद पवार’. साहेब तुम्हांला असं महाराष्ट्रातील तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना अनाथ करून जाता येणार नाही. तुम्हांला राजीनामा परत घ्यावाच लागेल.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा