योगी सरकारचा मोठा निर्णय! अतिक अहमदच्या ताब्यातील घरे,जमिनी पीडितांना परत करणारच

0
2

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात काही दिवसांपूर्वी गँगस्टर अतिक अहमद याची हत्या करण्यात आली. त्यानंतर देशभरात एकच गोंधळ उडाला.त्यानंतर राज्यातील योगी सरकारवर टीका करण्यात आली होती.दरम्यान, आता या घटनेनंतर योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गँगस्टर अतिक अहमद याने ताब्यात घेतलेल्या जमिनी आणि घरं पीडितांना परत करण्यासाठी आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

योगी सरकारकडून आयोग स्थापन करून पीडितांची मालमत्ता त्यांना कायदेशीर मार्गाने परत केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगींच्या या निर्णयाचे प्रयागराजच्या झाल्वा येथील रहिवाशांनी स्वागत केले आहे.झाल्वा येथील रहिवासी जयश्री उर्फ ​​सूरज कली यांनी गेल्या 35 वर्षांपासून त्या माफिया अतिक अहमदविरोधात लढत आहेत. त्या म्हणाल्या, ‘माझ्याकडं वडिलोपार्जित साडे बारा एकर जमीन होती. ती जमीन माफिया अतिकनं ताब्यात घेतली. एवढंच नाही तर 1989 मध्ये माझे पती ब्रिजमोहन उर्फ ​​बच्चा कुशवाह देखील गायब झाले होते. त्यांचा आजपर्यंत कोणीही शोध लावला नाही.’ असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मात्र, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या निर्णयाचं पीडित सूरज कली यांनी स्वागत केले आहे मुख्यमंत्री योगी हे संपूर्ण राज्यासाठी वडिलांसारखे असून त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलं. गेल्या 35 वर्षांपासून माफिया अतिक अहमदकडून आपली जमीन परत मिळवण्यासाठी लढा देत असलेल्या सूरज कली यांना सीएम योगींच्या निर्णयामुळं त्यांची मालमत्ता परत मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.