कर्नाटकात वारं फिरतंय! काँग्रेसला अच्छे दिन तर भाजपचं धाबं दणाणलं; ओपिनियन पोल

0
2

कर्नाटकात भाजपची सत्ता जाणार आणि कॉंग्रेसला बहुमत मिळणार असा अंदाज नुकत्याच आलेल्या ओपिनीयन पोलमधून समोर आला आहे. त्यामुळे भाजपचं धाबं दणाणलंय आहे, तर दुसरीकडे कॉंग्रेसला मुठभर मांस चढलं आहे. कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सी वोटर संस्थेने कर्नाटकातील जनतेचा कौल जाणून घेतला. कर्नाटकातील जनता सध्या सत्ता परिवर्तन करण्याच्या मू़डमध्ये दिसत असल्याचं या ओपिनियन पोलमधून दिसत आहे.

कर्नाटकात सी व्होटरनुसार:- 

भाजपला 68 ते 80 जागा

कॉंग्रेसला 115-127 जागा

जनता दलला 23 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कर्नाटकात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत आणि बहुमताचा आकडा 113 आहे. कॉंग्रेसला या निवडणुकीत 115 ते 127 जागा मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. म्हणजेच कॉंग्रेस पक्ष बहुमताचा आकडा सहज पार करेल असा अंदाज या पोलमधून समोर आला आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

महाराष्ट्रातील सत्तांतर सरकार, राहुल गांधींची रद्द झालेली खासदारकी यामुळे कॉंग्रसमध्ये निराशेचं वातावरण होतं. आता कर्नाटकात सत्ता येत असल्याचं चित्र निर्माण झाल्याने कॉंग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कर्नाटकात नेत्यांचा भाजपमधून कॉंग्रसमध्ये येण्याचा सपाटा सुरू आहे. भाजपमधून कॉंग्रेसमध्ये आतापर्यंत डझनभर नेते सामील झाले आहेत. त्यात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांचाही समावेश आहे. निवडणूक देशाची असो वा राज्याची निवडणुकीपूर्वी अनेक ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल येत असतात. काही पोल खरे ठरले आहेत तर काही खोटेही ठरलेत. मात्र कर्नाटकातील हे पोल आणि अंदाज खरे ठरणार की खोटे हे 13 मे रोजीच स्पष्ट होईल.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या!