EVM मध्ये नावाचा क्रम बदलला, पक्षांची मक्तेदारी की सुलभता? पक्ष आणि उमेदवारांची अशी दिसणार नावं!

0

नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे. आता राज्यात महापालिका निवडणुकीपाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचीही निवडणूक लवकरच पार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी ग्रामविकास विभागाने निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठा बदल केला आहे. या पुढे निवडणुकीत ईव्हीएम आणि बॅलेट मशीनवर राष्ट्रीय पक्ष, त्यानंतर प्रादेशिक पक्ष मग अपक्ष उमेदवाराची नाव दिसणार आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया आणखी सोप्पी होणार आहे.

ग्रामविकास विभागाच्या वतीने राजपत्र प्रसिद्ध करण्यात आलं आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील कलम २७४ च्या पोट-कलम (२) चे खंड (बारा) व (तेरा), तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ५७ च्या पोट-कलम (२) आणि (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि यासंदर्भात त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र सरकारने राज्य निवडणूक आयुक्तांशी विचारविनिमय करून महाराष्ट्र पंचायत समित्यामध्ये आणखी सुधारणा करून नियम तयार केले आहे. EVM

अधिक वाचा  भाजपच्या पुणे ‘सर्जिकल स्ट्राईक’ नंतर कोअर कमिटीत 100 नावांवर एकमत ; आधी आपला बाब्या अन् नंतर….?

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काही बदल करण्यात आलं आहे. यापुढे ईव्हीएम आणि बॅलेट मशीनवर राष्ट्रीय पक्ष , त्यानंतर प्रादेशिक पक्ष मग अपक्ष उमेदवारांची नाव येणार आहे. या आधी अल्फाबेट आडनाव प्रमाणे उमेदवार नाव ईव्हीएम मशीनवर येत असायची. त्यामुळे राष्ट्रीय, प्रादेशिक पक्षाच्या उमेदवाराची नावं खाली जात होती. आता नव्या गॅझेट प्रसिद्ध झाल्यामुळेळे राष्ट्रीय पक्षाचे आणि प्रादेशिक पक्षाच्या उमेदवार नाव सर्वातवर असतील.

काय आहे नेमके बदल?

महाराष्ट्र पंचायत समित्या नियम १९६२ मध्ये तातडीने सुधारणा करणे आवश्यक असल्याबाबत तसंच हे नियम पूर्व प्रसिध्दीशिवाय लागू करणे गरजेचं असल्याची महाराष्ट्र शासनाची खात्री झाली आहे आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम पाच) च्या कलम २७४ च्या पोट- ट-कलम (३) मधील तरतुदीमधून सूट आहे. त्याअर्थी, आता महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील कलम २७४ च्या पोट-कलम (२) चे खंड (बारा) व (तेरा), तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ५७ च्या पोट-कलम (२) आणि (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि यासंदर्भात त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, राज्य निवडणूक आयुक्तांशी विचारविनिमय करून, महाराष्ट्र पंचायत समित्यामध्ये आणखी सुधारणा करून, याद्वारे पुढील नियम तयार करीत आहे:-

अधिक वाचा  काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन; या महापालिकेत एकत्र लढायचं का? कार्यकर्त्यांनी 238 मतदारसंघात… दादांचं हे मत

१. या नियमांना महाराष्ट्र पंचायत समित्या नियम २०२५ असे म्हणण्यात येईल. महाराष्ट्र पंचायत समित्या नियम, १९६२ मधील नियम २१ मध्ये, उप-नियम (२) ऐवजी पुढील उप-नियम समाविष्ट करण्यात आहे.

पहिला गट – भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या ज्या पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली आहे असे मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आणि महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्ष यांचे उमेदवार,

दुसरा गट – भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या ज्या इतर राज्यातील राज्यस्तरीय पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाने नोंदणी केली आहे अशा पक्षांचे उमेदवार

तिसरा गट – राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी झालेले अमान्याप्राप्त राजकीय पक्ष यांचे उमेदवार,

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?

चौथा गट – अपक्ष उमेदवार

वरीलप्रमाणे प्रत्येक गटातील उमेदवारांचा क्रम लावताना तो मराठी भाषेतील वर्णानुक्रमानुसार लावण्यात यावा. उमेदवारांचा क्रम लावताना प्रथम त्यांचे आडनांव (आडनाव नसल्यास नाव), त्यानंतर नाव आणि त्यानंतर पत्ता विचारात घ्यावा आणि मुळ नियमांमध्ये समाविष्ट केलेल्या नमुना क्रमांक ३ ऐवजी पुढीलप्रमाणे नमुना क्रमांक ३ समाविष्ट करण्यात येईल.

अशी दिसेल EVM मध्ये नाव

1. भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या ज्या पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेली आहे असे मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आणि महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्ष यांचे उमेदवार.

2. भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या ज्या इतर राज्यातील राज्यस्तरीय पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली आहे अशा पक्षांचे उमेदवार

3. राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी झालेले अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष यांचे उमेदवार.

4. अपक्ष उमेदवार