राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीचं अखेर ठरलं, जागावाटपाबाबतही सगळं ठरल्याची चर्चा; हा पहिला विजय राज्यात परिवर्तन घडवणार?

0
24

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात युती होणार असल्याचे बोलले जात आहे. राज्यभर सर्वत्र कार्यकर्त्यांमध्ये या विषयावर चर्चा सुरू असतानाच या दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनीही एकत्र निवडणुकीला सामोरे जाण्यासंदर्भात सकारात्मक असल्याबाबतचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सुतोवाच केलेले आहे. विशेष म्हणजे मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यास आगामी काळातील राजकारण बदलू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. मुंबई महापालिकेच्या तसेच एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी हे दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्रित निवडणुकीचा शुभारंभ  आता या मुंबईतील महत्त्वाच्या निवडणुकीपासून सुरू करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई मध्ये होणारी ही निवडणूक दोन्ही बंधूंची युती प्रत्यक्षात नावारुपाला आली आहे हा संदेश संपूर्ण राज्यभर पाठवण्यासाठी लढवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या युतीचा फॉर्म्यूलाही समोर आला आहे. मुंबई महापालिकेसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. हीच शक्यता लक्षात घेऊन विरोधी बाकावरही महायुतीच्या तिन्ही(भारतीय जनता पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी) घटकपक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे मनसे आणि ठाकरे गटानेही आपापल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. युतीचं काय करायचं ते आम्ही बघू. हा निर्णय आमच्यावर सोडा. तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा, असं नुकतेच उद्धव ठाकरे म्हणाले होते. तसेच मनसेचे राज ठाकरे यांनीही ठाकरे गटासोबतच्या युतीचा निर्णय माझ्यावर सोडा. मी योग्य भूमिका घेऊन ती जाहीर करेन, असं आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे आता ही युती कधी नावारुपाला येणार? याकडे सर्वांचच लक्ष लागलेलं असतानाच मुंबईतील बेस्ट कामगार मतपेढीची निवडणूक शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र सामोरे गेल्यास महाराष्ट्रातील नव्या युतीचा अध्याय सुरू होणार आहे.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली

दोन्ही ठाकरेचे ही एकत्र निवडणूक लढवणार…

दरम्यान, लवकरच मुंबईतील बेस्ट कामगार मतपेढीची निवडणूक होणार आहे. याच निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी युती केल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे त्यांच्यात जागावाटपही ठरले असल्याचे बोलले जात आहे. उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार आहेत. या युतीमध्ये जागावाटपावर आजच (7 ऑगस्ट) शिक्कामोर्तब होणार असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार या निवडणुकीत एकूण 21 जागांपैकी 19 जागांवर उद्धव ठाकरेंची कामगार सेना निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर उर्वरित 2 जागा मनसेच्या बेस्ट कामगार संघटनेला देण्यात येतील, असे बोलले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप