कोथरूडमध्ये ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत म्हातोबा गडावर वृक्षारोपण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम संपन्न

0
2

पुणे : पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या पर्यावरणपूरक संकल्पनेतून साकारलेल्या एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत आज पुणे शहरातील कोथरूड मध्य मंडलातर्फे म्हातोबा गडावर भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय मंत्री मा. मुरलीधर आण्णा मोहोळ आणि कॅबिनेट मंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनंदनीय उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला.

संपूर्ण देशात पर्यावरण संरक्षणाची आणि वृक्षारोपणाची चळवळ अधिक तीव्र करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड माँ के नाम’ ही संकल्पना मांडली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश प्रत्येक व्यक्तीला आपल्या आईच्या नावाने एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची प्रेरणा देणे हा आहे. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच, भावी पिढ्यांसाठी स्वच्छ आणि हरित पर्यावरणाची निर्मिती करणे हे यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे. याच उद्दिष्टाला अनुसरून आज कोथरूडमधील या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

म्हातोबा गडासारख्या निसर्गरम्य ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केल्याने वृक्षारोपणाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले. या कार्यक्रमात पहलगाम येथील अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले के. संतोष जगदाळे व के. कौस्तुभ गणबोटे यांच्या स्मरणार्थ पण वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कै. संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे, कन्या आसावरी जगदाळे, के. कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता गणबोटे, चिरंजीव कुणाल गणबोटे इ. उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वी अंमलबजावणी भाजप कोथरूड मध्य मंडलाचे अध्यक्ष निलेश कोंढाळकर यांनी केली होती. श्री. कोंढाळकर यांनी यावेळी बोलताना, “आमच्या मंडलाला मुरली अण्णा आणि चंद्रकांत दादांचे मार्गदर्शन लाभले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. पंतप्रधानांच्या संकल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आज लावलेली ही रोपे केवळ झाडे नाहीत, तर ती भविष्यासाठीची गुंतवणूक आहेत,” असे देखील नमूद केले.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली

या वृक्षारोपण कार्यक्रमाला भाजपचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कोथरूड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी आपल्या कुटुंबासह येऊन वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घेतला. लहान मुलांनीही उत्साहाने झाडे लावली, ज्यामुळे त्यांच्यातही पर्यावरणाबद्दल जागरुकता निर्माण झाली. उपस्थित सर्वांनी ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाचे कौतुक केले आणि भविष्यातही अशा उपक्रमांमध्ये सहभाग घेण्याची ग्वाही दिली. हा कार्यक्रम केवळ एक वृक्षारोपण सोहळा नसून, पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल ठरले, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.