पुण्यात भाजपचं महापालिका ‘मिशन’ ठरलं! एवढ्या जागा लढणार? युतीत निवडणूक लढविणे अशक्य: घाटे

0

महापालिकेच्या निवडणुका येत्या चार-पाच महिन्यात होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. आगामी निवडणुका या महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून लढल्या जाणार की स्वबळाचा याचा ठोस निर्णय अद्याप झालेला नाही. पण कार्यकर्ते, पदाधिकारी कामाला लागले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी पु्ण्यात मुक्कामाला होते. पुणे शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी पदाधिकाऱ्यांसह आज त्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना कामाला लागा, अशा सूचना दिली आहे. महानगरपालिका निवडणुकांची पार्टीने जोरात तयार केली पाहिजे, आपला महापौर महापालिकेत बसला पाहिजे अशा पद्धतीने कामाला लागा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अधिक वाचा  सांगलीत काय घडतंय? रात्रीत साखर कारखान्याचे नाव बदलून जत संस्थानच्या राजाच्या नावाचा फलक; आमदार पडळकरांनी दिला होता इशारा

“आमचे 105 नगरसेवक आहेत त्या जागा पुन्हा निवडून येणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. कोण किती जागा लढवणार याचा फॉर्म्युला प्रदेश स्तरावर ठरणार आहे. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ज्या जागा आम्ही निवडून आलोय त्या सगळ्या लढवणार आहोत, असे घाटे म्हणाले. पुण्यात रविवारी सांयकाळी 4 वाजता आम्ही तिरंगा रॅली काढणार असल्याचे घाटे यांनी सांगितले.

स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढाव्यात, अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पुण्यात फॉर्म्युला देखील सांगितला. सरसकट युती न करता ज्या ठिकाणी स्वाभाविक युती होऊ शकते त्या ठिकाणी युती करण्यात येणार असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.

अधिक वाचा  महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण दुर्देवी न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार

पुण्यात महायुती म्हणून निवडणूक लढविणे अशक्य असल्याचे चित्र आहे. जागा वाटप हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही घटक पक्षामध्ये जागा वाटपावरुन रस्सीखेच होईल, हे स्पष्ट आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये स्वबळावरच निवडणुका लढवाव्या लागतील, असे दिसते. 2017 च्या महापालिका निवडणुकीत 164 पैकी 99 जागा भाजपने जिंकल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसने 42 जागा जिंकून दुसर्‍या क्रमाकाचा पक्ष होता.