महाराष्ट्र आरटीओच्या निर्णयाने ‘ओला’ची घसरण 40 हून अधिक स्टोअर्स बंद; 131 स्टोअर्सची तपासणी 214 स्कूटर जप्त

0

भाविश अग्रवाल यांची ओला इलेक्ट्रिक पुन्हा एकदा जागीच कोसळली आहे. इलेक्ट्रिक स्कूटरच्या गुणवत्तेपासून ते सेवेतील दिरंगाईपर्यंत सर्वच कारणांमुळे टीकेच्या भोवऱ्यात सापडलेल्या ओला इलेक्ट्रिकला 40 हून अधिक स्टोअर्स बंद करावे लागले आहेत. काही महिन्यांपूर्वी ओला इलेक्ट्रिकने एकाच वेळी 4000 स्टोअर्स उघडून नवा विक्रम प्रस्थापित केला होता. महाराष्ट्रात आरटीओकडून आतापर्यंत 131 ओला स्टोअर्सची तपासणी करण्यात आली आहे. या स्टोअर्समध्ये असलेल्या सुमारे 214 इलेक्ट्रिक स्कूटर जप्त करण्यात आल्या आहेत.

ओला इलेक्ट्रिकच्या प्रवक्त्याने मात्र ही आकडेवारी फेटाळून लावली आहे. अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या चिंता दूर करण्याचे काम कंपनी करत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

अधिक वाचा  दिवाळीचा पुणे मेट्रोला ‘झटका’! आर्थिक गणित बिघडले प्रवासी संख्या २.३६ लाखांवरून थेट १२ हजारांवर

महाराष्ट्रात आरटीओने ओला इलेक्ट्रिकला दुकान बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या स्टोअर्समध्ये ट्रेड सर्टिफिकेटशिवाय इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री आणि सर्व्हिसिंग करण्याचे काम कंपनी करत होती. यावर कडक कारवाई करत ओला इलेक्ट्रिकला दुकान बंद करण्यास सांगण्यात आले आहे.

43 दुकाने बंद

विविध आरटीओच्या अखत्यारीतील ओला इलेक्ट्रिक स्कूटरस्टोअर्स बंद करावेत, जेथे ट्रेड सर्टिफिकेटशिवाय व्यापार केला जात आहे, अशा सूचना महाराष्ट्राच्या सहपरिवहन आयुक्तांनी दिल्या आहेत. महाराष्ट्रात ट्रेड सर्टिफिकेट नसलेली 107 ओला स्कूटर स्टोअर्स आढळून आली आहेत. त्यापैकी 43 बंद करण्यात आले आहेत. आणखी 64 दुकाने एका दिवसाच्या नोटिशीवर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अधिक वाचा  मारणे टोळी सूत्रधार रुपेश मारणेच्या मुसक्या आवळल्या; भाजप कार्यकर्त्याला मारहाणी ९ महिने होता फरार

एवढ्या इलेक्ट्रिक स्कूटर जप्त

महाराष्ट्रात आरटीओकडून आतापर्यंत 131 ओला स्टोअर्सची तपासणी करण्यात आली आहे. या स्टोअर्समध्ये असलेल्या सुमारे 214 इलेक्ट्रिक स्कूटर जप्त करण्यात आल्या आहेत.

ओला इलेक्ट्रिकच्या प्रवक्त्याने मात्र ही आकडेवारी फेटाळून लावली आहे. अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या चिंता दूर करण्याचे काम कंपनी करत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

मात्र, ओलाला यापूर्वी अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर अनेक युजर्सनी ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या त्रुटींबद्दल आपल्या पोस्ट लिहिल्या आहेत. दरम्यान, कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल आणि कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यात ‘एक्स’वरून जोरदार वाद झाला आहे.

अधिक वाचा  सांगलीत काय घडतंय? रात्रीत साखर कारखान्याचे नाव बदलून जत संस्थानच्या राजाच्या नावाचा फलक; आमदार पडळकरांनी दिला होता इशारा

64 दुकाने एका दिवसाच्या नोटिशीवर बंद करण्याचे आदेश

महाराष्ट्रात ट्रेड सर्टिफिकेट नसलेली 107 ओला स्कूटर स्टोअर्स आढळून आली आहेत. त्यापैकी 43 बंद करण्यात आले आहेत. आणखी 64 दुकाने एका दिवसाच्या नोटिशीवर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.