पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये पोहोचले. मधुबनी येथे राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त एका जाहीर सभेला त्यांनी संबोधित केलं. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी त्यांचं स्वागत केलं. आजच्या भाषणाला सुरूवात करण्यापूर्वी पंतप्रधानांनी पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली.






स्वातंत्र्याच्या अनेक दशकानंतर संसदेची नवी इमारत मिळाली. तसेच 30 हजार पंचायत भवन निर्माण केले. पंचायतीला फंड देण्यावर प्राधान्य दिलं आहे. गेल्या दशकात दोन लाख कोटीचा फंड पंचायतीला दिला आहे. हा संपूर्ण पैसा गावाच्या विकासासाठी वापरण्यात आला असं त्यांनी सांगितलं. गावातील एक मोठी समस्या जमीनच्या वादाची राहिली आहे. पंचायतीची जमीन कोणती, सरकारी जमीन कोणती आहे. आणि शेतीची जमीन कोणती आहे यावरून वाद होत होता. त्यामुळे जमिनीचं डिजीटलीकरण केलं जात आहे. त्यामुळे अनावश्यक वाद सोडवण्यात मदत मिळाली आहे.
पंचायतीत महिलांना 50 टक्के आरक्षण देणारं बिहार पहिलं राज्य
पंचायतीने सामाजिक भागिदारीला कसं सशक्त केलं आहे हे आपण पाहिलं. बिहार देशातील पहिलं राज्य होतं , ज्या पंचायतीत महिलांना 50 टक्के आरक्षण दिलं आहे असं पंतप्रधानांनी नमूद केलं. महिलांचं उत्पन्न वाढवण्यासाठी रोजगार आणि स्वयं रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकार मिशन मोडमध्ये काम करत आहे. बिहारमधील जिविका दीदी योजना सुरू आहे. बिहारच्या बहिणींच्या बचत गटाला १ हजार कोटी रुपयांची मदत दिली आहे. त्यामुळे बहिणींच्या आर्थिक सशक्तीकरणाला बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तीन कोटी लखपती दीदी बनवण्याचं टार्गेट ठेवलं आहे. त्यासाठी फायदा होणार आहे,असं मोदी म्हणाले.












