कोथरूड 17 एप्रिलची एकच चाहूल; नातं रक्ताचं अविरत मैत्रीचं अनोख पाऊल! ३२व्या ‘रक्तदान यागा’चं उद्घाटकही मैत्रीचंच; राम बोरकरांचा गौरवास्पद उपक्रम 

0

कोथरूड विधानसभा मतदारसंघ 17 एप्रिल म्हटलं की म्हणजेच हिंदुत्वनिष्ठ स्व.शिरिष तुपे स्मृती दिन..!  एकच चाहूल लागते ती म्हणजे नातं रक्ताचं अविरत मैत्रीचं हे ब्रीद वाक्य मनाशी कायम ठेवत राम बोरकर यांनी सलग बारा वर्ष सुरू ठेवलेलं रक्तदानाचं अनोख पाऊल! यंदा ३२व्या ‘रक्तदान यागा’चं उद्घाटकही मैत्रीच असून कोणताही मान्यवर उद्घाटक न बोलवता कोथरूड विधानसभा मतदारसंघातील सर्व मान्यवर मित्रपरिवार यांच्याच हस्ते उद्घाटन ठेवून राम बोरकर नवा अनोखा गौरवास्पद पायंडा सुरू केला आहे. सामाजिक कार्याचे संस्थापक स्वर्गीय शिरीष तुपे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सलग ३२ व्या वर्षी संपन्न होणाऱ्या, या भव्य रक्तदान यागाचे औपचारीक उदघाटन. नातं मैत्रीचं किती नितळ आणि निस्वार्थ याची जाणीव 3 दशक एरंडवणा भागातील नागरिकांना यात आहेच कारण या भागात स्वा.वीर सावरकर मित्र मंडळ (ट्रस्ट) एरंडवणे व राम बोरकर मित्र परिवाराच्या वतीने “मैत्री” रक्ताची जपुया ! चला “ रक्तदान ” करूया ! या संकल्पाने …मैत्रीचं ….रक्ताचं जपत अविरत कै. शिरिष तुपे यांच्या स्मरणार्थ सलग ३२व्या वर्षी भव्य रक्तदान यागाचे (शिबिराचे) आयोजन करण्यात आले आहे. पुणे शहरातील राजकीय,सामाजिक,शैक्षणिक आणि सांकृतिक क्षेत्रात भरीव योगदान असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थीत दि. १७ एप्रिल रोजी शिबिराचे उद्घाटनही मित्र परिवाराच्या साक्षीनेच सकाळी ११.३० वाजता स्वा.वीर सावरकर मित्र मंडळ (ट्रस्ट) एरंडवणे येथे केले जाणार आहे.

अधिक वाचा  भाजपच्या ‘पॅनल प्रमुख’च गळाला धोरणाने पालकमंत्री नाराज; थेट ‘तिरकी’चाल अन् बेरजेतून 2007चा पॅटर्न?

रक्तदानाचे काम गेली 32 वर्ष अविरतपणे करताना असंख्य मित्र जुळत ‘सक्रिय’ सहभागी होत गेल्यामुळेच आज प्रत्येक रक्तदान शिबिराचे आयोजन करताना नवीन मित्र जुळत जातात ही खरे तर कै. शिरीष तुपे यांची पुण्याई आणि मैत्रीच्या नात्याला अनन्य साधारण महत्व आहे याची जाणीव करून देणारी घटना. हीच हिंदुत्वनिष्ठ स्व.शिरिष तुपे स्मृती दिन..! निमित्त ‘रक्तदान यागा’चं संयोजनास कायम नवचैतन्य आणि उर्मी हे या रक्तदान शिबिराचे वैशिष्ठ असल्याचे संयोजक राम बोरकर यांनी सांगितले. या वेळी हा कार्यक्रम सकाळी ९ ते सायं ५ या वेळेत होणार आहे.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती मनुवादी विचारांना गाडून खऱ्या अर्थाने लोकशाहीची अंमलबजावणी करणारी संस्था आहे – आनंदराज आंबेडकर

१७ एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यालय निसर्ग हॉटेल जवळ एरंडवणा गावठाण पुणे ४ . सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून वाढत्या तापमानाचा विचार करून रक्तदान याग आयोजन समितीने शिबिरामध्ये विशेष खबरदारी घेत स्प्रिंगलर आणि कुलर याचीही व्यवस्था केली आहे. दरवर्षीप्रमाणे या वेळेस ही आपण या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे. वेळे अभावी प्रत्यक्ष भेट शक्य झाली नाही म्हणून हेच आग्रहाचे निमंत्रण समजून या कार्यक्रमास आपली उपस्थिती नोंदवावी हि नम्र अशी विनंती राम बोरकर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.

अधिक वाचा  भाजपच्या पुणे ‘सर्जिकल स्ट्राईक’ नंतर कोअर कमिटीत 100 नावांवर एकमत ; आधी आपला बाब्या अन् नंतर….?