महाबोधी महाविहार बोधगया मुक्ती साठी बौद्ध महामोर्चाची तहसीलदार कार्यालयात धडक

0

पनवेल दि. १९ (रामदास धो. गमरे) बौद्ध धम्मियांचे श्रद्धास्थान महाबोधी महाविहाराचे (बोधगया, बिहार) संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या ताब्यात हवे परंतु अधिनियम बी.टी. १९४९ मुळे सदर महाविहार बौद्ध व हिंदू अश्या उभय धर्मियांच्या ताब्यात आहे, जे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १३, १४, १५, २५, २६ चे पूर्णतः उल्लंघन करणारे आहे तसेच अनुचित पद्धतीने बौद्धांच्या धार्मिक हक्कांवर अतिक्रमण करणारे आहे तरी असे अतिरेकी अधिनियम रद्द करण्यासाठी जगभरातील भन्तेजीने मोठं आंदोलन उभे केले आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी बौद्धजन पंचायत समितीच्या सर्व शाखा, गटप्रतिनिधी, विविध राजकिय, सामाजिक, धार्मिक संघटना, जयंती महोत्सव समिती तसेच तमाम बौद्ध बंधू-भगिनींनी प्रभाकर कांबळे, दिनेश जाधव, मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते प्रांत कार्यालय येथे महामोर्चा काढून बोधगया मुक्ती आंदोलनाला जाहीर पाठींबा दिला.

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे

सदर प्रसंगी भन्तेजी पूर्ण रोशन आणि भन्तेजी अश्वमेघ, बौद्धजन पंचायत समितीचे खजिनदार नागसेन गमरे, विश्वस्त मंडळ, विभाग प्रतिनिधी आणि सर्व पदाधिकारी महिला मंडळ, सभासद नथुराम साखरे, हरिभाऊ पवार, भगवान कांबळे, जिनावास कदम, दीपक जाधव, शरद जाधव, उद्देश पवार, सुरेखा साखरे, दिलीप कदम, बबन पवार, सखाराम कदम, कमलाकर कांबळे, प्रल्हाद जाधव, सुगंध कदम, रमेश गमरे, आशिष कदम, विठोबा पवार, ऍड. संदीप साळवे, राजेश गाडे, आम्रपाली गाडे, सतीश गमरे, राजेश लोखंडे, जि. बी. कदम, अनंत साळवी, रुके, प्रभाकर जाधव, आणि सर्व शाखा पदाधिकारी सदस्य, महिला मंडळ, आर. पी. आय. पनवेल महानगर पालिका क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे, पत्रकार निलेश सोनावणे, मुलगंध श्री विहार ट्रस्ट चे अध्यक्ष दिनेश जाधव, शक्ती संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष सुभाष गायकवाड, परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे, मोहन गायकवाड, माजी नगरसेवक प्रकाश विनेदार, एकनाथ गायकवाड, भारतीय बौद्ध महासभेचे महेंद्र मोरे, कोमोठे रिपाई शहर अध्यक्ष मंगेश, स्वाभिमानी युथ रिपब्लिकन सेने रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे, रायगड जिल्हा रिपब्लिकन सेना उपाध्यक्ष सुधीर पवार, प्रबुद्ध सामाजिक संस्था अध्यक्ष कुणाल लोंढे, नरेंद्र गायकवाड, संदीप भालेराव, मिलिंद कांबळे, सोरटे, बाबू गायकवाड, अनुराधा, शारदा शिरोळे, राज सदावर्ते, कामगार नेते अनिल जाधव, राहुल गायकवाड, राजेश खंडागळे, रायगड जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव धडक मोर्चा काढून सरकारने लवकरात लवकर अन्यायकारक अधिनियम बी.टी. १९४९ हटवून महाबोधी महाविहाराचा संपूर्ण ताबा बौद्घ धम्मास द्यावा असे सरकारला सूचित केले.

अधिक वाचा  भाजपच्या ‘पॅनल प्रमुख’च गळाला धोरणाने पालकमंत्री नाराज; थेट ‘तिरकी’चाल अन् बेरजेतून 2007चा पॅटर्न?

सरतेशेवटी सर्व आंदोलनकर्त्यांनी बोधगया मुक्ती आंदोलनास आपला जाहीर पाठिंबा दर्शवून सभा तहकूब करून सरकारी नियमानुसार शांततेत आपापल्या गंतव्यस्थानी प्रस्थान केले.