सध्या धार्मिक उन्माद देशाचा माहौल आता मशिदी झाकून… हा संकुचितपणा… संजय राऊतांचा खरमरीत इशारा

0

देशातील सध्याच्या धार्मिक उन्मादावर खासदार संजय राऊत यांनी कठोर टीका केली. देशात होळीला मशिदी झाकून ठेवण्याची, त्यावर अच्छादन टाकण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. इतकेच नाहीतर हा संकुचितपणा देशाला आणि धर्माला परवडणारा नसल्याची चपराक सुद्धा त्यांनी सरकारला लगावली. त्यांनी गेल्या दहा वर्षातील देशातील बदलेल्या मानसिकेतवर आसूड ओढला. सहिष्णुतेचा नारा देणार्‍या भारतीय संस्कृतीची ओळख मिटत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. राजकीय धुळवडीवर सुद्धा त्यांनी मंथन केले. आज माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी देशाचा माहौल बिघडल्याचा गंभीर आरोप सरकारवर केला.

आता दिल्लीत ती प्रथा बंद

आम्ही कोणालाही विरोधक समजत नाही. नक्कीच आज होळी आहे. रंगपंचमी आहे एक महत्त्वाचा सण आहे. अनेक वर्ष हा सण सगळे एकत्र येऊन आम्ही साजरा करतो. आता काल दिल्लीत होतो दिल्लीमध्ये मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, वाजपेयी असे प्रमुख नेते त्यांच्या घरी होळी व्हायची आणि सर्व राजकीय पक्षाचे आणि धर्माचे लोक त्या होळीमध्ये सहभागी होत असत. पण गेल्या काळी काळापासून ही प्रथा बंद झाली, अशी खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

ही संकुचितपणा परवडणारा नाही

आम्ही फार संकुचित होत आहोत आणि हा संकुचित पणा या देशाला आणि आपल्या समाजाला आले हिंदू धर्मालाही परवडणारा नाही आमची प्रतिमा जगभरात लिबरल सहिष्णू अशी आहे, म्हणून हिंदू धर्माला जगामध्ये मान आहे. आमच्या धर्माचा रक्षण करून आम्ही आमच्या सांस्कृतिक सर्वांना सामावून घेतो दुर्दैवाने गेल्या दहा वर्षात मोकळेपणा आमच्या संस्कृतीला संपला नष्ट केला आणि आपण दिवसेंदिवस अधिक संकुचित आणि धर्मांध होण्यासाठी विशिष्ट गट आपल्याला प्रवृत्त करतो, असा घणाघात संजय राऊत यांनी घातला.

होळी हा सर्वांनी एकत्र येऊन रंग उधळण्याचा सुख दु:खामध्ये एकत्र येण्याचा सण आहे उत्सव आहे आज देशांमध्ये काय चालू आहे महाराष्ट्रात काय चालू आहे कुठे मशि‍दीवरती झाकून ठेवण्याची वेळ येते कुठे होळी एका बाजूला आणि नमाज दुसर्‍या बाजूला ठीक आहे हे सुद्धा दिवस निघून जातील, असा आशावाद त्यांनी मांडला.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

जन सुरक्षा अधिनियमावर गंभीर आरोप

यावेळी संजय राऊत यांनी जन सुरक्षा अधिनियमावर गंभीर आरोप केले. पण आम्ही व्यक्ती स्वातंत्र्यासाठी आवाज उठवू असे ते म्हणाले. आमच्यासारखी लोक सतत लढा देत आली आहेत. तुम्ही आमच्या हक्काचे आणि स्वातंत्र्याची गळचेपी करणारा असाल तर या देशांमध्ये लोक स्वस्त बसणार नाही. धर्माच्या अफूची भांग देऊन तुम्ही आमच्या स्वातंत्र्यावरती गदा आणू शकत नाही आणि सरकारला वाटत असेल तुमच्या विरुद्ध कोण उभा राहील. आम्ही आहोत. आमच्या सारखे लाखो लोक आहेत, असे ते म्हणाले. सरकारच्या दडपशाही विरुद्ध ताकदीने उभे राहू. आम्हाला परवा नाही. देशाचे स्वातंत्र्य महत्वाचे आहे. भाजपचे स्वातंत्र्य महत्त्वाचे नाही आमचे आणि जनतेचे स्वातंत्र्य महत्वाचे आहे, असे त्यांनी ठणकावले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा