राज्यात पुन्हा वादंग? आशा भोसले मराठी भाषा दिनानिमित्त मोठे वक्तव्य आपण खरा इतिहास वाचावा जो पुरंदरेंनी वैगरे लिहलाय…

0

‘छावा’ या सिनेमामुळे सध्या खरा इतिहास आणि खोटा इतिहास यावरून सध्या बराच वाद सुरू आहे. दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप होत असताना शिवकालीन इतिहास आणि वाद मिटण्यापेक्षा वाढण्याचे संकेत दिवसेंदिवस मिळत आहेत. विभिन्न इतिहासकार वेगवेगळी मते मांडत असताना त्यांचे संदर्भही विभिन्नच मिळत आहेत. इतिहासकार इंद्रजीत भालेराव यांचे प्रकरण ताजे असतानाच ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी एक मोठं विधान केलं आहे. ‘आपण खरा इतिहास वाचला पाहिजे…… इंग्रजांनी लिहिलेला नाही आपला खरा इतिहास ……जो पुरंदरेंनी वैगरे लिहलेला आहे. तसा इतिहास वाचला पाहिजे.’ असं विधान आशा भोसले यांनी केलं आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. ज्यासाठी सिनेक्षेत्रातील अनेक दिग्गजांना बोलवण्यात आलं होतं. ज्यामध्ये आशा भोसले यांचा समावेश होता. या कार्यक्रमात अनेक दिग्गजांनी मराठी भाषेबाबत आपली मतं व्यक्त केली. तर आशा भोसले यांनीही आपल्या भाषणातून मराठी भाषेविषयी बऱ्याच गोष्टी सांगितलं. पण याचवेळी त्यांनी इतिहासाबाबातही भाष्य केलं आहे.

‘खरा इतिहास जो पुरंदरेंनी वैगरे लिहलेला आहे, तो वाचला पाहिजे…’, आशा भोसले नेमकं काय म्हणाल्या?

इंग्रजी हे खरंच महत्त्वाचं आहे. पण आपली मातृभाषा राखून इंग्रजी शिकलं पाहिजे. तर मी असं सांगते की, आजकाल मराठी लोकं घरात बोलताना इंग्रजीच बोलतात. आता आई मुलीला गुड मार्निंग म्हणाली आणि मुलगी आईला गुड मॉर्निंग म्हणाली तर… अरे सुप्रभात म्हणा ना..

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

 ‘मला आणखी एक वाटतं की, मराठी शाळांमधून एक तास मराठी पुस्तक चांगलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र एक पान रोज वाचायचं. असं करावं असं मला वाटतं. ते पुस्तक आईकडे पण पोहचतं करावं.. कारण आईने पण वाचलं पाहिजे की, आपला खरा इतिहास काय आहे, इंग्रजांनी लिहिलेला नाही आपला खरा इतिहास जो पुरंदरेंनी वैगरे लिहलेला आहे. तसा इतिहास वाचला पाहिजे.’ असं विधान आशा भोसले यांनी यावेळी केलं आहे.’

‘या भाषेला दुधारी तलवार पण आहे आणि या भाषेचं अवधान नाही ठेवलं तर कुठल्या कुठे अर्थ निघून जातो. ऱ्हस्व, दीर्घ सगळं पाहावं लागतं. चार-पाच दिवसांपूर्वी मला राज ठाकरेंचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की, ते एकदम उत्साहात होते की, ते मला म्हणाले की, आशाताई.. आशाताई.. त्यांचा तो ठाकरी आवाज.. ‘आशाताई 27 तारखेला संध्याकाळी काही झालं तरी तुम्ही मला हव्या आहात.’

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

‘मी आजारी होते तरी राज साहेबांना नाही कसं म्हणायचं.. तो दोस्त आहे आणि दोस्ताला कोणी नाही म्हणतं का?’ असं आशा भोसले यावेळी म्हणाल्या.