भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी दुबईतील आंतरराष्ट्रीय मैदानावर दाखल झाला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराहने चॅम्पियन्स ट्रॉफी संघातून माघार घेतली होती. त्याच्या जागी हर्षित राणाला संघात जागा देण्यात आली. पण आता कट्टर प्रतिस्पर्ध्यांच्या सामन्यापूर्वी बुमराह दुबईमध्ये दाखल झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून विश्रांती घेत असलेल्या बुमराहला आज आपल्याला दुबईमध्ये पाहाता येणार आहे. बुमराच्या आगमनामुळे पाकिस्तानी चाहत्यांची चिंता नक्कीच वाढली आहे.






बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनंतर पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह मैदानाबाहेर गेला. त्यानंतर बुमराह इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत पुनरागमन करेल असे सांगितले जात होते. पण दुखापत गंभीर असल्यामुळे शेवटच्या क्षणी जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी संघातून वगळण्यात आले आणि भारतीय संघाला मोठा धक्का बसला. बुमराहसारखा गोलंदाज संघाबाहेर असणे ही भारतीय संघासाठी धक्कादायक गोष्ट होती.
चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतल्यानंतर बुमराहने बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे त्याच्या पुनर्वसन प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर बुमराह वर्कआऊट करताना देखील पाहायला मिळाला. त्यानंतर बुमराह लवकरच पुनरागम करेल अशी चाहत्यांना खात्री बसली आणि आता बुमराहला दुबईत पाहून भारतीय चाहते सुखद धक्का बसला आहे.













