‘मला हलक्यात घेऊ नका, शिंदेंचा एक्झिट प्लॅन ॲक्टीव्ह? शाहांच्या पुणे दौऱ्यादरम्यान मोठी राजकीय घडामोड

0

मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीत नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री पदावरून शिंदे आणि फडणवीस यांच्यात दरी निर्माण झाल्याचं बोललं जातंय. यातूनच अलीकडे पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या काही बैठकींना शिंदे गैरहजर राहिले होते. तसेच त्यांनी ‘मला हलक्यात घेऊ नका, मी काय करू शकतो, हे 2022 मध्ये दिसलं’ असं वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे.

शिंदेंचं हे वक्तव्य महाविकास आघाडीसाठी असल्याचं सांगितलं जात असलं तरी हा महायुतीलाच इशारा असल्याचं बोललं जातंय. एकीकडे शिंदेंच्या नाराजीच्या चर्चा सुरू असताना आता शिंदेंनी महायुतीतून बाहेर पडण्याचा एक्झिट प्लॅन ॲक्टीव्ह केल्याचं बोललं जातंय. याचं कारण म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पुणे दौरा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आहे. शुक्रवारी उशिरा ते पुण्यात दाखल झाले आहेत. ते पुण्यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

अमित शाह यांच्या सर्व कार्यक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असणार आहेत. मात्र, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शाहांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार नाहीत. पुण्यातील अमित शहांच्या कार्यक्रमांकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवल्याने एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा एक्झिट प्लॅन अॅक्टीव्ह केल्याची चर्चा आहे.

पुण्यामध्ये आज केंद्रीय गृह विभागाची पश्‍चिम विभागीय बैठक पार पडणार आहे. या महत्त्वाच्या बैठकीसाठी शाह पुणे दौऱ्यावर आले आहेत. आजच्या गृह विभागाच्या बैठकीला महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा आणि नगर हवेली, दमण दीव येथील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. देशाच्या पश्चिम विभागातील तीन मुख्य राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेशातील सर्व ग्रह खात्याचे महत्त्वाचे अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. इतक्या महत्त्वाच्या बैठकीला शिंदे उपस्थित राहणार नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

असा असेल अमित शाहांचा दौरा

अमित शाह सकाळी आकरा वाजता कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल वेस्टीनमध्ये पश्चिम विभागीय परीषदच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ही सुरक्षा विषयक बैठक असणार आहे. दुपारी तीन वाजता ते जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावणार आहेत. हा कार्यक्रम हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात कार्यक्रम होणार आहे. यानंतर पाच वाजता अमित शाह बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रिडा संकुलात प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरण आणि निधीचे वितरण करणार आहेत.