‘ऑपरेशन टायगर’ उद्धव ठाकरे भडकले; भरसभेतच दिलं ओपन चॅलेंज, तूम्ही मर्दाची अवलाद असाल तर एकतरी…

0

शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगरची पुन्हा चर्चा जोरदास सुरू आहे. ठाकरेंचे 6 खासदार संपर्कात असल्याचा दावा शिवसेनने केला आहे. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी जोरदार निशाणा साधत शिवसेनेला खुले आवाहन दिले आहे. हिंमत असेल तर खासदार फोडून दाखवा… आता आमचा अंत बघू नका, आता फोडाफोडी केली तर तुमची डोकी फुटतील असे म्हणत उद्धव ठाकरेंचं शिवसेनेला खुलं आव्हान दिले आहे. तसेच ईडी आणि सीबीआय बाजूला ठेवून समोर या असे म्हणत शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरवर उद्धव ठाकरेंनी हा प्रहार केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या कार्यअहवालाचं प्रकाशन कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी हे आव्हान दिलं आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

आपल्याला पराजय पचवत नाही त्यांना जय पचवत नाही. मुख्यमंत्री कोण हे ठरवायला त्यांना एक महिना लागला. डोकं नाही म्हणून दाढी खाजवतात.रूसूबाई रूसू गावात जाऊन बसू… ⁠आता संयम बघू नका.. मर्दाची अवलाद असाल तर एकतरी खासदार फोडून दाखवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मी भाजपला सोडले आहे हिंदुत्वाला नाही. हिंदुत्वाचे सोंग पांघरून जर कोणी देश लुटत असतील तर मी कट्टर हिंदू आण् राष्ट्रप्रेमी म्हणून मी तुम्हाला सोडणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबईला भिकेचे डोहाळे लावले : उद्धव ठाकरे

आर्थिक राजधानीला भिकेचे डोहाळे लावले. सगळ्यात जास्त कर देणारी एकटी मुंबई आहे. कोस्टल रोड हा देवेंद्र फडणवीसांचा नाही ना मोदींचा आहे ना गद्दांराचा आहे. हा मुंबई महापालिकेचा आहे. 2 लाख 30 हजार कोटीचे कर्ज करून ठेवालं आहे. मी तुम्हाला मुंबई गिळू देणार नाही. बटेंगे तो कटेंगे हे मराठी माणसासाठी होते. उद्या महापालिका नाही चालली तर ती उद्योगपतींना देऊन टाकणार का? असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी केला आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

रूसूबाई रूसू गावात जाऊन बसू… शिंदेंना टोला

उद्धव ठाकरे म्हणाले, दिल्लीला टॉर्च बंद पडला की काळोख पसरेल तेव्हा यांची चेंगराचेंगरी होईल. नगरविकास खात्यात जो धेंड बसविला आहे त्याला विचारा? काही नाही मिळाले की रूसूबाई रूसू जनता येत्या काळात म्हणेल घरात घूसू…. तलवार आहे पण चालवण्यासाठी मनगट पाहिजे यांचे मन मेले फक्त गट राहिले.