मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रहार म्हणाले, मुख्यमंत्री साहेब तुमचे चुकीच पाऊल पडतयं…तुम्ही अपयशी झालायं…

0

मुख्यमंत्री साहेब तुमचे चुकीच पाऊल पडायला लागला आहे, जोपर्यंत तुमचे पाऊल चुकीच पडत नव्हते तेव्हा समाज शांत होता. मुख्यमंत्री तुम्हाला भेटुन देशमुख कुटुंबीय हाताश होत असेल तर तुम्ही आजच अपयशी झाला आहात. तुमचे सरकार खंडणी खोर चालवतो की काय अशा पद्धतीने वागत आहात. लोक न्यायासाठी टाहो फोडत आहेत आणि तुम्ही हसत आहात. एखादा आरोपी सुटला तर धनंजय मुंडे यांच्या टोळीचे जगणं मुश्किल करू, असे थेट आव्हान मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांना दिले.

अधिक वाचा  राज्यात सत्ता बदलाचे केंद्र मुंबई पुणे ठरणार? महाराष्ट्रात आता 2 नाही 3 आघाड्या? 

सर्व अपयश मुख्यमंत्र्यांचे
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला कोणालाही सोडणार नाही. त्यामुळे देशमुख कुटुंबियांनी विश्वास ठेवला. यामुळे महाराष्ट्र शांत आहे. परंतु तपास यंत्रणेचे हात बांधलेली आहे की काय अशी शंका येत आहे. आता सर्व जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. मुख्यमंत्री आरोपी वाचवायला लागले आहेत की काय? अशी आता शंका येत आहे. यापुढे सगळे यश अपयश हे मुख्यमंत्र्याकडे राहणार आहे, असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे म्हणाले, तुम्हाला अजून आरोपींचा मोबाईल सापडत नाही. त्यामध्ये खूप पुरावे असतील. त्यामुळे त्यांनी तो मोबाईल फेकून दिला आहे. वाल्मिक कराड याला अजूनही ३०२ का लावला जात नाही? तो पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा मोठा आहे की काय? असा सवाल मनोज जरांगे यांनी केला आहे.

अधिक वाचा  भाजपची यादी पुण्यात दाखल अजूनही प्रवेश सुरूच?; प्रशांत जगतापांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम? काँग्रेसचे माजी राज्यमंत्री भाजपवासी?

…तर मुंडे टोळीचे जगणे अशक्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, देशमुख कुटुंबियांना धक्का लागला तर आम्हाला सुद्धा मराठे म्हणतात फडणवीस साहेब. देशमुख कुटुंबियातील एकाही ही माणसाच्या जीवाला काही झाले तर धनंजय मुंडे यांच्या टोळीचे जगणे मुश्किल होईल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या तपासाची माहिती देशमुख कुटुंबियांना दिली जात नाही. ती आजच देण्यात यावी, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. खंडणीमुळे हा खून झाला आहे. हा विषय सरळ आहे. पैशाची मागणी केली म्हणून खून केला. तुम्ही जर त्याला मोकळे सोडणार असेल तर देशमुख कुटुंबाचा धीर सुटणार आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.

अधिक वाचा  पक्ष प्रवेशातच वादळ काँग्रेस, उबाठा माजी नगरसेवकांचा प्रवेश; मंत्री महोदयांसमोर कार्यकर्ते भिडले बंदोबस्त तैनात