“”मोर्चे काढण्याचा सर्वांना अधिकार आहे, पण बीडच्या प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी कारवाई करत आहेत. निर्धाराने कारवाई होत आहे. या प्रकरणांमध्ये काहीही झालं तरी कोणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी, आम्ही वाचू देणार नाही. कोणालाही वाचवले जाणार नाही, जे जे दोषी आहेत, या प्रकरणाचे अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात, जे लोक हफ्ते वसुली करतात अशा सगळ्यांवर जर बसवण्याचा आम्ही ठरवलं आहे. त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई सुरू आहे”, असं मोठं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते ते नागपूरात भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानात बोलत होते.






जनतेला संबोधीत करताना फडणवीस म्हणाले, पक्षाची लोकाभिमुखता, संघटनेची लोकाभिमुखता आणि लोकप्रतिनिधींची लोकाभिमुखता या तिन्ही लोकाभिमुखतेच्या आधारावर आपण आपलं यश टीकवू शकू. या तीन गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे. कारण संघटनेमुळे आणि जनतेमुळे सत्ता आपल्याला मिळाली आहे. कारण संघटनेने जनतेच्या आणि सरकारच्या मधला दुवा म्हणून काम केलं आहे. म्हणून जनतेनं आपल्यावर विश्वास ठेवला आणि आपल्याला निवडून दिलं. भारतीय जनता पक्षाची मालकी जनतेची आहे.
देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात पुढे म्हणाले, आता जनतेच्या अपेक्षा मोठ्या आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एका सेतूचं काम हे संघटनेला आणि कार्यकर्त्यांना करावं लागणार आहे. एकीकडे संपर्क आणि दुसरीकडे संवाद या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. संपर्काचा कार्यक्रम आपण सुरु केला आहे. आपले सर्व सदस्य या संपर्काच्या माध्यमातून आपण तयार करू.
“भारतीय जनता पार्टी लोकतांत्रिक पार्टी आहे.. देशात 2300 पेक्षा जास्त नोंदणी कृत पार्टी आहेत. भाजप आणि कम्युनिस्ट पार्टी या दोन पार्टी सोडल्या, तर बाकी पार्टी कुठल्या ना कुठल्या परिवाराच्या आहेत. राष्ट्रीय पार्टी म्हणून भाजप एकमात्र पार्टी आहे, ज्याची मालकी ही जनता आहे. लोकतांत्रिक पद्धतीने चालणार पक्ष हा भाजप आहे. या पक्षात चहा विकणारा मुख्यमंत्री, प्रधानमंत्री होतो. 2014 साली ज्यावेळी अमित शाह भाजपचे अध्यक्ष झाले. त्यावेळी त्यांनी एक टार्गेट ठेवलं होतं. भाजपला जगातील सर्वात मोठा पक्ष बनवा, असंही फडणवीस म्हणाले.
11 कोटी सदस्य तयार करून जगातील सर्वात मोठा पक्ष भाजप झाला आहे. राज्यात सध्या 1 कोटी सदस्य आहेत. यावेळी दीड कोटी नागरिकांना सदस्य बनवण्यासाठी टार्गेट आहे. नागपूर महानगराने सात लाखाचं टार्गेट ठेवलं आहे. चांगलं टार्गेट आहे पण याला मेहनत करावी लागेल. हे शंभर टक्के शक्य आहे. पण मेहनतीशिवाय हे शक्य नाही.राज्यात भाजपचा विस्तार झाला. 100 पेक्षा जास्त जागा विधानसभा मध्ये निवडून येणार पक्ष म्हणजे तुमचा आणि माझा भाजप पक्ष आहे, असं मोठा विधान फडणवीसांनी यावेळी केलं











