सुरेश धस यांचा बीड प्रकरणावरून संकेत काय? बकरे की मां कब तक दुवा मांगेगी…

0

बीडमधील मस्सोजगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून राज्यात वातावरण तापलेलं असून दोन दिवसांनी बीडमध्ये मूक मोर्चाचेही आयोजन करण्यात आलं आहे. आता याच प्रकरणावरून एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. मास्टरमाईंड असणारा आका सुटणार नाही असं बीड जिल्ह्याचे आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे. बकरे की माँ कब तक दुवा मांगेगी असं म्हणतात, तसं ही बकरी कुठंपर्यंत जाईल हे थोड्या दिवसात कळेल. आका कितीही पळाला तरीही तो पकडला जाईलच असंही सुरेश धस टीव्ही9 मराठीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हणाले. ‘ पोलीस तपास सुरू आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकच शब्द वापरला आहे. मी कुणालाही सोडणार नाही. त्यामुळे यातील मास्टरमाइंड मी ज्याला आका म्हणतो तो सुटणार नाही. तो कितीही पळाला तरी तो पकडला जाईल’ अशी आम्हाला खात्री आहे, असं धस यांनी नमूद केलं.

अधिक वाचा  भाजपच्या ‘पॅनल प्रमुख’च गळाला धोरणाने पालकमंत्री नाराज; थेट ‘तिरकी’चाल अन् बेरजेतून 2007चा पॅटर्न?

यापूर्वी बोलताना सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यात गँग ऑफ वासेपूर सुरू आहे असा मोठा आरोप केला होता. बीडमध्ये कायदा-सुव्यस्था आहे की नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या विधानावरूनही बराच गदारोळ माजला होता. मात्र आज दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या घटनेचा मास्टरमाईंड लवकरात वकर पकडला जाईल असा विश्वास व्यक्त केला.

काय म्हणाले सुरेस धस ?

पोलीस तपास सुरू आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकच शब्द वापरला आहे. मी कुणालाही सोडणार नाही. त्यामुळे यातील मास्टरमाइंड मी ज्याला आका म्हणतो तो सुटणार नाही. तो कितीही पळाला तरी तो पकडला जाईल. मी सभागृहात मागणी केली होती. एसआयटी स्थापन केली होती. मी पत्र देताना एसपीचा उल्लेख केला होता. पण साहेबांनी डायरेक्ट आयजीकडेच तपास दिला आहे. त्यामुळे जोरात तपास सुरू आहे. बकरे की माँ कब तक दुवा मांगेगी असं म्हणतात तसं ही बकरी कुठंपर्यंत जाईल हे थोड्या दिवसात कळेल. विशेषत: आम्ही व्यक्तिगत म्हटलं तर, सरकारी वकिलाची नेमणूक करणं असो, एसआयटी स्थापन करणं असो, त्या कुटुंबाला दहा लाखाची मदत करणं असो याबाबत समाधानी आहोत. पण माझं मत आहे की हा आका लवकरात लवकर पकडला जावा. पोलीस पकडतील. स्कॉटलँड यार्ड नंतर आपली ख्याती आहे, त्यामुळे पोलिसांनी पटकन शिताफी दाखवावी असं सुरेश धस म्हणाले.

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?

जे एसपी आकाच्या इशाऱ्यावर चालत होते…

जे एसपी आकाच्या इशाऱ्यावर चालत होते, मुख्यमंत्र्यांनी एका दिवसात त्यांची हकालपट्टी केली आहे, आता नवीन एसपी दिले आहेत. एसपी आणि सीआयडीची एसआयटी चौकशी करत आहे. आका पकडला जाईल असं आम्हाला वाटतं. आका पकडल्यावर आकाच्या आकाचा काही संबंध आहे का हे दिसून येईल, असं त्यांनी नमूद केलं.

मी आता नाव घेणार नाही. आकाच्या आदेशापर्यंत होऊ शकत नाही. आकाच्या गाड्या सर्व विष्णू चाटेच्या नावावर आहे. विष्णू चाटेच आदेश देत होता. विष्णू चाटे आदेश देत असताना आकाशी बोलत होता. त्याला कसं मारतोय, कसं क्रुरतेने मारतोय हे व्हिडीओ कॉल करून दाखवलं आहे. हे आकाला आणि विष्णू चाटेलाही दाखवलं असेल, हे मला शंभर टक्के वाटतं, असा आरोप त्यांनी केला. मी कधीच कुणाला घाबरलो नाही. माझं स्टेटमेंट हे झालं आहे. भीती बिती, दहशत आणि यांच्या आकाला मी घाबरत नसल्याचे सुरेश धस यांनी सांगितलं.

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे