विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीच्या बाजुने निकाल दिलाय. महाविकास आघाडीला हा खूप मोठा धक्का आहे. कांग्रेसने काही ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात काम केल्याचा आरोप करण्यात आलाय. एकंदरीत विधानसभेचा अनुभव पाहता ठाकरेंची शिवसेना महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात सूचक विधान केले आहे.






स्वबळावर लढाव असं पक्षातील बऱ्याच जणांचा वाटतंय. संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी असे करायला हवे, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. कार्यकर्त्यांचे म्हणणे नेतृत्वाने ऐकून घेतले आहे. लगचे त्यावर प्रतिक्रिया द्यायची आवश्यकता नाही. इतकी घाई करायची आवश्यकता नाही, असे अंबादास दानवे म्हणाले. काल पराभूत उमेदवारांची मातोश्रीवर बैठक झाली. पराभूत उमेदवारांनीच नव्हे तर विजयी उमेदवारांनीदेखील तक्रारी केल्या आहेत.अनेक तक्रारी आमच्याकडे येतायत, असे दानवे म्हणाले.
काही ठिकाणी मत कमी मोजली गेली कुठे तरी पाणी मुरतय. ईव्हीएममध्ये पाणी मुरतंय. त्यामुळे ईव्हीएम विरोधात जन आंदोलन उभं राहण्याची गरज आहे. महाराष्ट्रात नाही तर देशात आंदोलन उभ राहण्याची गरज आहे. काही ठिकाणी मत पेट्या उघड्या आल्या त्याबद्दल निवडणूक आयोगाने बोललं पाहिजे, असे ते म्हणाले.











