कोथरूड आंबेडकरी चळवळीचे प्रमुख केंद्र मिलिंद संघ नवी घोषणा….; कोथरुडची गणितं बिघडवणार?

0

कोथरूड मतदार संघातील आंबेडकरी चळवळीचे प्रमुख केंद्र असणाऱ्या मिलिंद संघामध्ये काल अपक्ष उमेदवार विजय बापू ढाकले यांची निवडणुक प्रचारार्थ भेट आयोजित करण्यात आली होती परंतु या भेटीदरम्यान कोथरूडमध्ये पहिल्यांदाच दलित आणि मराठा हे समीकरण एकत्र होते की काय अशी शंका निर्माण झाली आहे. अपक्ष उमेदवार विजय बापू ढाकण यांनी मनोज जरांगेपाटील आणि युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्या घेतलेल्या भेटी आणि काल मिलिंद संघामध्ये अपक्ष उमेदवार विजय बापू ढाकले पोहोचतात नव्यानेच कानवर पडलेली घोषणा आली….

बाबासाहेबांची एकच दीक्षा….

……बटन दाबू फक्त आणि फक्त रिक्षा!

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

यावेळी मिलिंद संघाच्या तरुण सहकार्यांनी माझं केलेलं स्वागत आणि निवडणुकीमध्ये मला दिलेला जाहीर पाठिंबा हा माझं स्वतःचं आणि आंबेडकरी चळवळीचे बळ वाढवणारा आहे. मिलिंद संघाने मला दिलेल्या जाहीर पाठिंब्यामुळे याचा फायदा फक्त हनुमान नगर, केळेवाडीच नाही तर संपूर्ण कोथरूड मतदार संघात प्रभाग 9 10 12 13 अन् 31 मध्येही होणारच आहे, आत्ता निळ वादळ मैदानात आल असून याचे दूरगामी राजकीय परिणाम फक्त या विधानसभा निवडणुकी पुरते नाही तर आगामी काळातील आंबेडकरी चळवळीची ताकद वाढवणारा असेल असे विजय बाप्पू डाकले यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार