जयभवानी नगर येथे ॲड किशोर शिंदे यांच्या पदयात्रेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार ॲड किशोर नाना शिंदे यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२४ रोजी कोथरूड मधील जय भवानी नगर येथे पदयात्रा काढण्यात आली होती.

जय भवानी नगर येथील श्री साईबाबा मंदिरापासून या पदयात्रेला सुरुवात झाली. जय भवानी नगर हा तसा बैठी घरे आणि चाळींनी वसलेला भाग आहे. या चाळींमध्ये फिरत असताना किशोर शिंदे यांना नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत होता. अनेक ठिकाणी फटाक्याची आतषबाजी करून पुष्पवृष्टी करून किशोर शिंदे यांचे स्वागत केले जात होते. महिला भगिनी मोठ्या संख्येने किशोर शिंदे यांचे औक्षण करण्यासाठी उपस्थित होत्या. किशोर शिंदे यांनी जय भवानी नगर मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर,शंकर महाराज मंदिर,शनि मारुती मंदिर येथे दर्शन घेतले.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

या पदयात्रेमध्ये बऱ्याच ठिकाणी नागरिकांनी मनसेचे उमेदवार म्हणून किशोर शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. किशोर शिंदे यांनी देखील स्थानिक रहिवाशांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या.

या पदयात्रेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्या पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा सुशीला ताई नेटके यांच्यासह माधवी शिंदे, स्नेहल शिंदे, वृषाली धुमाळ, अश्विनी क्षिरसागर तर मनसेचे कोथरूड उपविभाग अध्यक्ष गणेश शिंदे,अरुण हुलावळे, बाळासाहेब शिंदे, किरण उभे,सागर भगत, सचिन चव्हाण इत्यादी महाराष्ट्र सैनिक बहुसंख्य उपस्थित होते.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार