पुणे शहरातील वाढती लोकसंख्या, वाढता विस्तार आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम असणे गरजेचे आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील माहितीच्या अधिकृत उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्या स्नेहजीवी स्वभावाप्रमाणे पुणे शहराच्या या समस्या सोडवण्यासाठी एक साचेबंध प्रकल्प तयार केला असून त्या दृष्टीने वाटचाल सुरूही केली आहे. पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी जनजागृती जेवढी गरजेचे आहे ;तेवढ्याच प्रमाणात प्रशासकीय पातळीवरती राहिलेल्या छोट्या छोट्या अपूर्ण गोष्टी आणि निवडक कृती यावरती मात केल्यास पुणे शहरातील वाहतूक कोंडी ही समस्या राहणार नाही याची जाणीव चंद्रकांत दादा पाटील यांना झाली.






पुणे शहराला वाहतूक कोंडी निराकारणासाठी एक स्वतंत्र विभाग असतानाही वाहतूक कोंडी होते हीच गोष्ट या स्नेहजीवी नेतृत्वाला खटकली आणि त्यांनी यामध्ये लक्ष घालत सर्व अधिकाऱ्यांना यावरती उपाय शोधण्यासाठी एक पक्का अहवाल सादर करण्याचे आदेश देत पुणे शहरातील वाहतूक कोंडीला मोकळे करण्याचा संकल्प केला. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पुणे सुरक्षित राखण्यासाठी जनजागृती बरोबरच काही प्रशासकीय बदलांची आवश्यकता लक्षात घेऊन महायुती सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुणे पोलिस आयुक्तालय हद्दीत सात नव्या पोलिस ठाण्यांची स्थापना करण्यात येणार असून, आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी या भागांचा समावेश आहे. यामुळे या निर्णयासाठी पाठपुरावा करणाऱ्या कोथरूडच्या आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नांना यश लाभले आहे.
नवीन पोलिस ठाण्यांच्या निर्णयासोबतच पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी तब्बल ६० कोटी रुपयांचा निधी आणि ८१६ अतिरिक्त पोलिस कर्मचारीही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे, पुणे शहरात कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी एक प्रभावी आणि ठाम पाऊल उचलण्यात आले आहे. महायुती सरकारच्या या निर्णयामुळे पुण्यात पोलिस दलाची ताकद आणखी वाढणार आहे. यासोबतच पुणे शहरात हजारो नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. दक्ष पोलिस अधिकारी आणि सीसीटीव्ही यंत्रणेमुळे पुणेकरांना एक सुरक्षित वातावरण मिळणार आहे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघ हे संपूर्ण माझं कुटुंब आहे त्याची सुरक्षा ही माझी जबाबदारी या भावनेने चंद्रकांत दादा पाटील यांनी कोथरूडच्या चौका चौकामध्ये स्थानिक गणपती मंडळे ज्येष्ठ नागरिक संघ महिला बचत गट यांच्या सहयोगाने संपूर्ण मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. कोथरूडची जनता सुरक्षित राहावी ही भावना रात्रंदिवस मनात ठेवून हे नेतृत्व अहोरात्र काम कष्ट करत असल्याने कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांचा कौलही मिळण्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे. सर्वसामान्य पुणेकरांना हा महायुती सरकारचा निर्णय निश्चितच दिलासा देणारा ठरत असून पुणेकर या निर्णयासाठी महायुतीला संपूर्ण पुणे शहरात भक्कम साथ देतील असा विश्वासही प्रचारादरम्यान चंद्रकांत दादा पाटील व्यक्त करत आहेत.












