वरळीपासून शिवडी, धारावी, गुहागरपर्यंत…; महायुतीमध्ये 18 जागांवर पेच कायम, तिघांकडून वेट ॲंड वॉचची भूमिका

0

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात प्रथम भाजपकडून 99 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर काल शिवसेनेने (शिंदे गट) देखील 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. महायुतीचा भाग असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. मात्र आज भाजपकडून दुसरी यादी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु अजूनही महायुतीमधील 18 जागांवर पेच कायम असल्याचं समोर येत आहे.

महायुतीतील जागावाटपाचा तिढा अजूनही काही जागांवरील सुटलेला नाही. भाजपकडून 99, शिवसेनेनं 45, तर अजित पवार यांनीही काही उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. बंड शमवण्यासाठी या जागा जाहीर करण्यास महायुतीकडून सावध पवित्रा घेतला जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपमधील जागांचा तिढा कायम असून काही जागांवर वेट ॲंड वॉचची भूमिका घेण्यात आली आहे. तर काही जागांवर महाविकास आघाडीचा कोणता उमेदवार असणार? त्यावर महायुतीकडून उमेदवार निवड ठरणार असल्याची माहिती मिळत आहे.

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे

कोणत्या जागांवर पेच कायम आहे?

मुंबईतील जागा-

अंधेरी पूर्व – भाजप आणि शिवसेना दोघांचाही दावा
चेंबूर – शिंदेंचा दावा मात्र भाजप देखील मागत आहे
दिंडोशी – भाजप आणि शिवसेनेकडून दावा
कलिना – शिवसेना, भाजप दावा
वरळी – शिवसेना, भाजपचा दावा
वर्सोवा – भाजप आणि सेना दोघांचाही दावा
शिवडी – सेना आणि भाजप
धारावी – शिवसेनेचा दावा मात्र भाजपची देखील मागणी – गेल्या वेळेस भाजपनं लढली होती

ठाणे –

मिरा भाईंदर – गीता जैन – भाजपच्या नरेंद्र मेहता देखील इच्छुक

कोल्हापूर –

अधिक वाचा  EVM मध्ये नावाचा क्रम बदलला, पक्षांची मक्तेदारी की सुलभता? पक्ष आणि उमेदवारांची अशी दिसणार नावं!

कोल्हापूर उत्तर – कृष्णराज महाडिकसाठी भाजपचा दावा तर शिवसेनेकडून राजेश श्रीरसागर इच्छुक

सिंधुदुर्ग –

कुडाळ विधानसभा – आता शिवसेनेकडेच राहणार

रत्नागिरी –

गुहागर – शिवसेना आणि भाजपकडूनही जोरदार तयारी

सोलापूर-

करमाळा – अपक्ष संजय शिंदे – मात्र भाजपकडून उमेदवार देण्याची तयारी

बार्शी – अपक्ष उमेदवार – भाजप दावा

अहमदनगर –

कोपरगाव – अजित पवार गट – स्नेहलता कोल्हे पाटील दावा (भाजप)

परभणी –

गंगाखेड (रासपकडे असलेल्या जागेवर भाजप लढण्याची शक्यता)

नांदेड –

लोहा (प्रतापराव चिखलीकरांसाठी भाजपचा दावा)

अमरावती –

बडनेरा (अपक्ष) – भाजपच्या उमेदवाराकडून देखील मागणी

अधिक वाचा  नगराध्यक्षांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत आनंदाची बातमी, सदस्यत्व व मताधिकार सरकार हा अध्यादेश काढणार

अकोला –

बाळापूर – भाजपच्या माजी आमदारांकडून मागणी – भाजपचा दावा