एकनाथ शिंदे यांनी पहिल्या यादीत किती लाडक्या बहिणींना दिली उमेदवारी ?

0

विधानसभा निवडणुकीला आता महिन्याभरापेक्षा पण कमी कालावधी उरला असून राजकीय पक्षांनी उमेदवार याद्या जाहीर करायला सुरुवात केली आहे. सर्वप्रथम रविवारी दुपारी भाजपाने उमेदवार यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली. भाजपाने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर महायुतीमधील दुसरा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उमेदवार यादी जाहीर केली. मंगळवारी रात्री महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोन पक्षांनी उमेदवार याद्या जाहीर केल्या. दोन्ही पक्षांनी आपल्या पहिल्या यादीत 45 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या पहिल्या यादीकडे सगळ्यांचच लक्ष होतं. दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत असताना बंड केलं. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या सर्व 40 आमदारांना पुन्हा संधी मिळाली आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणली आहे. या योजनेतंर्गत राज्यातील महिलांना महिना 1500 रुपये आर्थिक सहाय्य केलं जातं. मध्य प्रदेशच्या धर्तीवर आणलेली ही योजना महाराष्ट्रात गेमचेंजर ठरु शकते. म्हणून महाराष्ट्र सरकारकडून या योजनेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात येत आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या योजनेबद्दल भरभरुन बोलत असतात. आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पहिल्या उमेदवार यादीत किती महिला उमेदवारांना संधी दिलीय ते जाणून घेऊया.

मंजुळा तुळशीराम गावित कोण?

धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मंजुळा तुळशीराम गावित यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मागच्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मंजुळाताईंनी अपक्ष उभं राहून निवडणूक जिंकली होती. त्यांनी भाजपाच्या मोहन सूर्यवंशी यांचा पराभव केलेला. अपक्ष म्हणून निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. विशेष म्हणजे मंजुळा गावित यांनी दोनवेळा भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली. दोन्हीवेळा त्यांचा पराभव झाला.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

मनिषा वायकर कोण?

जोगेश्वरी पूर्वमधून शिवसेना शिंदे गटाने मनिषा वायकर यांना उमेदवारी दिली आहे. त्या रविंद्र वायकर यांच्या पत्नी आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी रविंद्र वायकर यांनी ठाकरे गटातून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अवघ्या 48 मतांनी निवडणूक जिंकून त्यांनी लोकसभेत प्रवेश केला. रविंद्र वायकर आधी आमदार होते. आता त्यांच्याजागी पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे.

यामिनी जाधव यांना पुन्हा उमेदवारी

भायखळ्यातून यामिनी यशवंत जाधव यांना उमेदवारी मिळाली आहे. यामिनी जाधव या विद्यमान आमदार आहेत. याआधी त्या नगरसेविका होत्या. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांना लोकसभेला दक्षिण मुंबईतून उमेदवारी दिली होती. पण अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला. आता पुन्हा त्यांना उमेदवारी मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच बंड केलं, त्यावेळी त्यांनी शिंदे गटाला साथ दिली.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता