शरद पवारांच्या उमेदवारांची संभाव्य यादी : बारामतीत तगडा उमेदवार! आंबेगाव, घाटकोपर चाही समावेश

0

भारतीय जनता पार्टीने रविवारी आपल्या 29 जणांची यादी जाहीर केल्यानंतर आज अजित पवारांच्या पक्षाची पहिला यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. एकीकडे महायुतीमधील घटक पक्षांनी यादी जाहीर केलेली असतानाच विरोधी पक्षात असलेल्या शरद पवारांच्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली संभाव्य यादी समोर आली आहे.उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरुन टोकाचे मतभेद असल्याने शरद पवार मध्यस्थी करत असतानाच दुसरीकडे त्यांच्या पक्षाची संभाव्य यादी समोर आली आहे. ही 39 संभाव्य उमेदवारांची पहिली यादी  हाती लागली आहे.

यादीत कोणाकोणाचा समावेश?

संभाव्य उमेदवारांच्या यादीनुसार 11 विद्यमान आमदारांना शरद पवार गटाकडून पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तासगावमध्ये दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांच्याऐवजी मुलगा रोहित पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. संभाव्य उमेदवारांच्या यादीमध्ये अनेक माजी आमदारांचाही समावेश आहे. गेल्या वेळी विधानसभा लढलेल्या काही उमेदवारांचाही समावेश या यादीत आहे.

अधिक वाचा  अजितदादांची ही खेळी पुणेरी राजकारणात मोठी उलथापालथ; 3 पक्षात वादाचा भडका आणि भाजपाची ही गणिते बिघडली आत्ता दुरंगी लढती शक्य

शरद पवारांच्या पक्षाची संभाव्य उमेदवारांची यादी

1. जयंतराव पाटील – इस्लामपूर

2. डॉ. जितेंद्र आव्हाड – कळवा-मुंब्रा

3. अनिल देशमुख – काटोल

4. राजेश टोपे – घनसावंगी

5. बाळासाहेब पाटील – कराड ऊत्तर

6. रोहित पवार – कर्जत जामखेड

7. प्राजक्त तनपुरे – राहुरी

8. रोहित पाटील – तासगाव-कवठे महांकाळ

9. सुनील भुसारा – विक्रमगड

10. अशोक पवार – शिरूर

11. मानसिंग नाईक – शिराळा

12. शशिकांत शिंदे – कोरेगाव

13. संदीप क्षीरसागर किंवा ज्योती मेटे – बीड

14. हर्षवर्धन पाटील – इंदापूर

अधिक वाचा  भाजपचा महाराष्ट्रभर झंझावात; पण येथे अख्ख्या पॅनलचं डिपॉझिट जप्त; पक्षाचा आलेला निधी देखील तळापर्यंत गेलाच नाही; प्रदेश पातळीवर मोठी खलबते होणार 

15. राखीताई जाधव – घाटकोपर पूर्व

16. राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा

17. युगेंद्र पवार – बारामती

18. समरजीत घाटगे – कागल

19. राणी लंके – पारनेर

20. रोहिणीताई खडसे – मुक्ताईनगर

21. प्रभाकर देशमुख – माण खटाव

22. दिलीप खोडपे – जामनेर

23. राजीव देशमुख – चाळीसगाव

24. अमित भांगरे – अकोले

25. प्रतापराव ढाकणे – पाथर्डी

26. दिपीकाताई चव्हाण – बागलाण

27. प्रशांत जगताप – हडपसर

28. सचिन दोडके – खडकवासला

29. देवदत्त निकम – आंबेगाव

30. उत्तमराव जानकर – माळशिरस

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती मनुवादी विचारांना गाडून खऱ्या अर्थाने लोकशाहीची अंमलबजावणी करणारी संस्था आहे – आनंदराज आंबेडकर

31. नंदाताई कुपेकर- बाभूळकर – चंदगड

32. पृथ्वीराज साठे/ अंजली घाडगे – केज विधानसभा

33. भाग्यश्री आत्राम – अहेरी

34.गुलाबराव देवकर आप्पा – जळगाव शहर

35. प्रदीप नाईक जाधव – किनवट

36. जयप्रकाश दांडेगावकर – वसमत

37. बाबजानी दुराणी – पाथरी

38. विजय भाबंळे – जिंतूर

39. चंद्रकांत दानवे – भोकरदन