बिश्नोई गँगच्या टार्गेटवर राष्ट्रवादीचा आणखी एक नेता?; सिद्दिक्की हत्या यामुळे धमकी आली तरी ‘सुरक्षा’वाढ नाही

0

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. वांद्रे येथील निर्मलनगर परिसरात रात्री 9.15-9.30च्या सुमारास तीन हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला, त्यातल्या तीन गोल्या सिद्दीकी यांना लागल्याला तर एक गोळी त्यांच्यासोबत असलेल्या इसमाला लागली. या हत्याकांडामुळे प्रचंड खळबळ माजली असून मुंबईत दहशतीवचे वातावरण आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत तिघांना अटक केली आहे. त्यापैकी दोघे प्रत्यक्ष गोळीबार करणार आरोपी आहेत तर तिसरा हा त्यांना मदत करणार इसम आहे. दरम्यान या घटनेमुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरत टीका केली आहे. राज्यात कायदा सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली आहे. बिश्नोई गँगने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

जितेंद्र आव्हाडांच्या जीवाला धोका

याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हेही चर्चेत आले आहेत. बाबा सिद्दीकी यांची हत्या करणाऱ्या याच बिश्नोई गँगकडून जितेंद्र आव्हाड यांनाही धोका असल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी आव्हाडांना फोनवरून धमकी मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका संभवतो. याप्रकरणाची माहिती देऊनही पोलिसांनी आव्हाडांच्या सुरक्षेत वाढ केलेली नाही.

त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पोलीस ठाण्यात धाव घेत आव्हाडांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. तसेच आव्हाड यांच्या घराबाहेरची सुरक्षाही वाढवावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. आव्हाड यांची सुरक्षा वाढवली नाही तर आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादीचे पदाधिकारी हेमंत वाणी यांनी दिला आहेय यावर आता पोलीस काय ॲक्शन घेतात, आव्हाडांची सुरक्षा वाढवली जाते का याकडे सर्वांचे लागले आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. काल ( रविवार) बिश्नोई गँगने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या हत्येसंदर्भात अनेक खुलासे केले. सध्या फेसबुकवर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यामागे बिश्नोई गँग असल्याचा दावा करण्यात आला आहे. बिश्नोई गँगमधील एका सदस्याने ही पोस्ट शेअर केली आहे. या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या करण्यात आल्याचा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा