बौद्धजन पंचायत समिती स्मारक सभागृहाचे अंतिम टप्प्यातील काम जोमाने सुरू

0

मुंबई:  बौद्धजन पंचायत समिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह हे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतातील पहिले स्मारक असून, सदर स्मारक सभागृह सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांनी १९५७ साली उभे केले त्याला जवळपास ६० वर्षे उलटून गेली तरी त्याची डागडुजी, देखभाल, जीर्णोद्धार करण्यात आला नव्हता, परंतु सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचे पुत्र सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी समितीचा कारभार हाती घेतल्यानंतर त्यांनी सात मजली स्मारक सभागृह इमारत उभी करण्याचा संकल्प सोडला आणि समितीच्या सर्व शाखांनी मिळून सात मजली इमारत उभी करण्याचा ठराव पारित झाला, सदर इमारतीचे भूमीपूजन व पायाभरणी कार्यक्रम १२ डिसेंबर २०१२ साली इमारतीच्या कामाला सुरुवात झाली. मधल्या काळात आलेल्या अनेक शासकीय, राजकीय अडचणींना तोंड देत त्यावर मात करीत सर्व शासकीय अडचणी दूर करून सरसेनानी आनंदराज आंबेडकरांनी कामाची OC (Occupancy Certificate) मिळवून स्वतः जातीने जागेवर हजर राहून बांधकाम करून घेत आहे, सदर कामावर त्यांच बारकाईने लक्ष असून येणारा कच्चा माल, विटा, रेती, सिमेंट आदी बांधकाम सहित्याची काटेकोरपणे पाहणी करूनच त्यांचा वापर बांधकामासाठी करण्यात येत आहे. नुकतीच त्यांनी बांधकाम कॉन्ट्रॅक्टर आणि बांधकाम समितीची बैठक घेऊन अंतिम टप्प्यातील काम येणाऱ्या तीन ते चार महिन्यात पूर्ण करून घेण्याच्या सूचना दिल्या जेणेकरून लवकरात लवकर सदर स्मारकाचे लोकार्पण करता येईल.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

सध्या पाचवा मजला पूर्ण झाला असून व सहावा मजल्याचे काम पूर्णत्वास येत आहे व ते पूर्ण होताच सातव्या मजल्याचे काम सुरू होणार आहे सदर काम जोमाने सुरू असून समितीचे उपसभापती विनोद मोरे, सरचिटणीस राजेश घाडगे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, विवाह मंडळ सचिव अतुल साळवी यांनी कामाची पाहणी केली, सदर काम जोमाने सुरू असून लवकरात लवकरच स्मारक सभागृहाचे लोकार्पण सोहळा होणार असल्याने सर्व कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.