मुळशीत नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्यावतीने होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन

0

मुळशी येथील महिलांसाठी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्यावतीने क्रांती मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. विजेत्यांना स्कूटी, फ्रिज, टिव्ही अशी मोठी बक्षिसे तर सहभागी सर्वच महिलांना आकर्षक भेटवस्तू मिळाल्याने एकूणच कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण होते. दैनंदिन कामाच्या धावपळीतून वेळ काढत महिलांनी या कार्यक्रमाची तुफान आनंद लुटला.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष विनायकजी ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस वैशालीताई सणस, मा. जि. प. सदस्य शिल्पाताई ठोंबरे, तालुकाध्यक्ष राजाभाऊ वाघ, तालुका उपाध्यक्ष सुनिल दगडे पाटील, मनोहर(आण्णा) सणस, जिल्हा चिटणीस जीवन साखरे, तालुका सरचिटणीस सुनिल शिंदे, स्वीकृत नगरसेवक वैभव मुरकुटे, रामचंद्र देवकर, मारुती कुरपे, समीर खेगरे, गणेश सातव, वर्षाताई सातव, कोमलताई शेलार, डॉ. प्रतीक्षाताई कुडले, ऐश्वर्या भगत उपस्थित होते.

अधिक वाचा  EVM मध्ये नावाचा क्रम बदलला, पक्षांची मक्तेदारी की सुलभता? पक्ष आणि उमेदवारांची अशी दिसणार नावं!

प्रमुख बक्षिसांचे मानकरी
1)टू व्हिलर – सौ.प्राजक्ता गणेश गोळे, पिरंगुट मुकाईवाडी
2) फ्रीझ – सौ.माधुरी सुहास गावडे, लवळे
3) पीठ गिरणी – सौ.स्वाती आशिष नागरे – अंबडवेट
4) एल ई डी टीव्ही – सौ.सीमा कृष्णा शेलार – बोतरवाडी
5) शिलाई मशीन – सौ.सुप्रिया अक्षय काकडे – पिरंगुट ह्या महिला विजेत्या ठरल्या!