NDAच्या सरकारचा शपथविधी अन् खातेवाटपही झाले; आत्ता 26 जूनला अध्यक्षपदाची निवडणूक

0

नरेंद्र मोदी यांनी रविवारी 9 जून रोजी तिसयांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि मोदी सरकार 3.0 ला सुरुवात झाली. पंतप्रधान मोदींनी पदाचा पदभार स्विकारल्यापासून विविध निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. कारण शपथ घेतल्यानंतर काही तासांतच त्यांनी देशातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांनी किसान योजनेच्या 17 व्या हफ्त्याच्या फाईलवर सही केली. तर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 3 कोटी घरे बांधण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय मोदी सरकारमधील मंत्र्यांचं खातेवाटपही पूर्ण झालं.

अशातच आता मोदीनी शपथ घेतली त्याच महिन्यात म्हणजे जून महिन्यातच संसदेचे विशेष अधिवेशनाला सुरू होऊ शकते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार संसदेचे विशेष अधिवेशन 24 जून ते 3 जुलैपर्यंत चालू शकते. 24 आणि 25 जून रोजी संसदेच्या विशेष अधिवेशनात नवीन खासदारांचा शपथविधी होईल. तर खासदारांच्या शपथविधीनंतर लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक 26 जूनला होईल.

अधिक वाचा  सांगलीत काय घडतंय? रात्रीत साखर कारखान्याचे नाव बदलून जत संस्थानच्या राजाच्या नावाचा फलक; आमदार पडळकरांनी दिला होता इशारा

लोकसभा अध्यक्षांची निवड आणि राष्ट्रपतींचे अभिभाषण होईल त्यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावाचाही अधिवेशनात समावेश असू शकतो. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी केंद्र सरकारकडून सर्वप्रथम एका खासदाराचे नाव प्रस्तावित कण्यात येईल. या प्रस्तावाला विरोधकांनी विरोध न केल्यास निवडणुका होणार नाहीत. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दोन्ही सभागृहांच्या म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करू शकतात.