बंगालमध्ये खेला होबे! ममता दीदी पुन्हा भाजपला हादरा देण्याच्या तयारीत

0
2

पश्चिम बंगालमधील भाजपच्या 12 खासदारांपैकी किमान पाच खासदार तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे भाजप स्वबळापासून दूर राहिला असतानाच आता पुन्हा संख्या कमी होणार का? याची चर्चा रंगली आहे. हे खासदार पक्ष बदलण्याच्या आशेने ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या संपर्कात आहेत. ‘द टेलिग्राफ’ या इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालमधील 30 पराभूत भाजप उमेदवारांपैकी अनेकजण तृणमूलमध्ये सामील होण्यासाठी मागील दाराने प्रयत्न करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 12 पैकी किमान पाच जण तृणमुलकडे जाण्यास इच्छूक आहेत. परंतु त्यांच्यापैकी काही जण भाजपकडून केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळते की नाही हे पाहण्यासाठी वाट पाहत आहेत. जर ममता आणि अभिषेक बॅनर्जी यांनी शेवटी परवानगी दिली तर भाजपची राष्ट्रीय संख्या सध्याच्या 240 वरून खाली येण्याची चिन्हे आहेत.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

गरज पडल्यास पोटनिवडणूक जिंकण्याचा तृणमूलला विश्वास

एनडीएच्या मित्रपक्षांचे 10 पेक्षा जास्त खासदार आहेत जे आधीच इतर अनेक राज्यांमध्ये इंडिया आघाडीच्या संपर्कात आहेत, असेही तृणमूलच्या एका सूत्राने सांगितले आहे. गरज पडल्यास पोटनिवडणूक जिंकण्याचा तृणमूलला विश्वास आहे, पण प्रत्येक जणाला विश्वास नाही. काही खासदार पक्षांतर नियम बाजूला ठेवून विचार करत आहेत, असेही म्हटले आहे.

बंगालमध्ये 29 खासदारांसह तृणमूल 37 खासदार असलेल्या काँग्रेस आणि सपानंतर भारतातील तिसरा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केवळ राष्ट्रीय पातळीवर नव्हे तर भाजपला आणखी कमकुवत करण्यासाठी विचार करत आहेत, असे पुन्हा निवडून आलेल्या एका तृणमूल खासदाराने म्हटले आहे. ते म्हणाले की, पक्षांतर करू इच्छिणाऱ्या भाजपच्या पराभूत उमेदवारांचे काय केले जाईल याबद्दल अद्याप कोणतीही विश्वसनीय माहिती नाही. परंतु त्यांच्या उपयुक्ततेच्या आधारावर त्यांच्यापैकी काही स्वीकारले जाऊ शकतात.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

भाजपकडून खोचक प्रतिक्रिया

दरम्यान, भाजप खासदार तृणमूलमध्ये जाण्याच्या शक्यतेच्या वृत्तांना बंगाल प्रदेश भाजपकडून उपरोधिक प्रतिक्रिया देण्यात आली आहे. तृणमूलचा नंबर चुकीचा आहे. दोन किंवा तीन म्हणण्याऐवजी, त्यांनी असे म्हणायला हवे होते की भाजपचे सर्व खासदार तृणमूलकडे जाण्यास उत्सुक आहेत, असे भाजपचे बंगालचे मुख्य प्रवक्ते समिक भट्टाचार्य म्हणाले. जे सध्या दिल्लीत राज्यसभा सदस्य आहेत.