महाराष्ट्रातील लोकसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर एक वेगळं चित्र महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत असताना महाराष्ट्रातील पहिला निकाल नंदुरबार मधून हाती आला असून यामध्ये विद्यमान खासदार हिना गावित यांचा पराभव करत गोपाळ पाडवी यांनी पहिली गुड न्यूज महाविकास आघाडीला दिली आहे. महाराष्ट्रात सध्या मतमोजणीचा माहोल सुरू असताना यामध्ये किमान सात ते आठ जागांवरती विजयी आघाडी घेऊन महाविकास आघाडीची मुसंडी सुरू आहेच यापैकी श्रीकांत शिंदे आणि पियुष गोयल वगळता अन्य ठिकाणी महाविकास आघाडीचा डंका सुरू आहे.






राज्यात भारतीय जनता पक्षाने केलेल्या प्रयोगाला सरसकट जनतेने नाकारल्याचा हा संदेश असून मतमोजणी संपेपर्यंत चित्र आणखी धक्कादायक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मुंबई विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या पट्ट्यांमधून आघाड्यांमधील अंतर खूप कमी प्रमाणात असून यामध्ये प्रचंड तफावत आणि बदल होत आहेत त्यामुळे मतमोजणी संपेपर्यंत महाराष्ट्रातून काहीतरी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता ना करता येत नाही.
देशामध्ये सध्या आंध्र पदेश आणि बिहार या दोन राज्यांकडे सर्वांचे लक्ष लागलेलं असताना महाराष्ट्रामध्येही एक समाधानकारक चित्र निर्माण होईल अशी आशा महायुतीच्या सर्व नेत्यांना आहे परंतु मताधिक्य वारंवार स्थलांतरित होत असल्यामुळे सध्या राज्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.












