सर्व शासकीय यंत्रणा खिळखिळ्याच? पोर्शे कार अपघात प्रकरण ‘ब्लड रिपोर्ट’मध्येही फेरफार ससूनचे 2 डॉक्टर अटक

0
4

पुण्यातील कल्याणीनगर इथं झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी आता ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक केलीय. आतापर्यंत या प्रकरणी सात जणांना अटक झालीय. यामध्ये सर्व शासकीय यंत्रणा दोषी असल्याचे दिवसेंदिवस उघड होत असल्याने शासकीय यंत्रणा व्यावसायिक आणि धनाढ्य लोकांच्या आर्थिक हित संबंधामुळे खिळखिळी झाली आहे का हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरुवातीला कसबा  मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी या विषयावरती आवाज उठवत हे आंदोलन केले त्यावेळी त्यांच्यावर राजकारण करत असल्याचा आरोप केला जात होता परंतु नवनवीन खुलासे उघड होतात त्यांची भूमिका आता सामान्य पुणेकरांना पचनी पडत आहे.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

सामान्य पुणेकरांनी आजपर्यंत सध्या सत्तेत असलेल्या पक्षाला राष्ट्रीय राज्य आणि स्थानिक पातळीवरही पसंती दिलेले असताना नवनवीन खुलासे होतात. राज्यातील तपास यंत्रणा आरोग्य व्यवस्था किती खिळखिळी झाली आहे याची उदाहरणे पुण्यातून उघड होत असल्याने ही पुणेकरांसाठी कमीपणाची बाब आहे. परंतु शासकीय यंत्रणे या इतकी खिळखिळी झालेली असताना फक्त येतील कोणताही प्रमुख पक्ष याबद्दल बोलण्यापेक्षा पाठराखण करत आहे याचे खरे दुःख पुणेकरांच्या मनात वारंवार दिसत आहे.

१९ मे रोजी झालेल्या अपघतात अभियंता तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेत अल्पवयीन मुलगा कार चालवत होता. त्याच्या वडिलांसह आजोबांना याआधी अटक झालीय. आता ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहेत. याबाबत समोर आलेली माहिती अशी की, अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट ससून रुग्णालयामध्ये पाठवले होते, परंतु ब्लड रिपोर्टच्या रिपोर्ट मध्ये फेरफार केले गेले आहेत असा आरोप डॉक्टरांवर करण्यात आलाय. पोलिसांनी या प्रकरणी ससूनमधील डॉक्टर अजय तावरे यांना अटक केली आहे. आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आलेले आहे. डॉक्टर श्रीहरी हरलोर यांना देखील अटक करण्यात आलेली आहे.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

काय आहे पुण्यातील हिट अँड रन प्रकरण?

पुण्यात 19 मेच्या रात्री कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने आपल्या पोर्शे कारने 2 आयटी इंजिनिअर तरुणांना चिरडलं होतं. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. यामध्ये एक मुलगा तर दुसरी मुलगी होती. या प्रकरणामधील बिल्डरच्या मुलाला 14 दिवस बाल कारागृहात ठेवण्यात आलं आहे. पोलिसांनी मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना ताब्यात घेतलं आहे. पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये विशाल अग्रवाल, सुरेंद्र अग्रवाल आणि अपघात झाला त्यावेळी गाडीत असलेला ड्रायव्हर यांची एकत्र चौकशी होणार आहे.