नागपुरातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात तिघांना अटक; गाडीत दारूच्या बाटल्यांसह आढळला गांजा

0

पुण्यातील हिट अँड रन अपघात प्रकरण राज्यभरात गाजत असतानाच दुसरीकडे नागपूर शहरामध्ये अशाच पद्धतीची घटना घडली आहे. शहरातील दाटीवाटीचा परिसर असलेल्या महाल परिसरातील झेंडा चौकात एका मद्यधुंद कारचालकाने बेदारकपणे वाहन चालवत तिघांना धडक देत जखमी केलंय. यात पायी जाणारी महिला, पुरुष आणि तीन महिन्याचा चिमुकल्याचाही समावेश आहे. तर या अपघातात बाळाची अवस्था गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारात झेंडा चौकात ही घटना घडली होती. असे असताना या तपासात आता पोलिसांना धक्कादायक माहिती हाती लागली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपींच्या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या आणि गांजा देखील आढळून आला आहे.

या अपघातात सचिन सूर्यभान सुभेदार, नाझमिन शेख वसीम शेख, जोहान शेख वसीम शेख जखमी झाले आहेत. तर सनी चव्हाण, अंकुश ढाले आणि आकाश निमोरिया अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तिन्ही आसंशयित आरोपींवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सोबतच या घटणेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

अधिक वाचा  पुण्यात रात्रीत सर्वात मोठी घडामोड; पवारांची बिन आवाजाची काठी चालली अन् ‘देवाभाऊं’चे मनसुबे उधळले

गाडीमध्ये दारूच्या बॉटलसह 32 ग्राम गांजा

देशात एकीकडे पुण्यातील हिट अँड रन प्रकरण गाजत असताना नागपुरातील झेंडा चौकामध्ये अशाच पद्धतीची घटना घडली आहे. दारू आणि गांजा सेवन करून बेदारकपणे वाहन चलवणाऱ्या तरुणांनी रस्त्याच्याकडेने पायदळ जाणाऱ्या तिघांना उडवला आहे. यात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तिन्ही आरोपींवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर कोतवाली पोलिसांना या कारमध्ये 32 ग्राम गांजा आढळून आला आहे. तर यात तीन विदेशी दारूच्या बॉटल देखील मिळून आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

अधिक वाचा  भाजपच्या ‘पॅनल प्रमुख’च गळाला धोरणाने पालकमंत्री नाराज; थेट ‘तिरकी’चाल अन् बेरजेतून 2007चा पॅटर्न?

या प्रकरणी सनी चव्हाण, अंकुश ढाले आणि आकाश निमोरिया अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. तर संशयित आरोपी सनी चव्हाण हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यावर हत्येचा प्रयत्न, खंडणी, मारहाण यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. कोतवाली पोलिसांनी अपघात असलेली संशयित आरोपींची कार जप्त केली असून कारच्या आत मधले दृश्य बघितल्यानंतर संशयित आरोपी काय अवस्थेत कार चालवत होते, याचा अंदाज येतो.

संतप्त नागरिकांचा कार चालकाला बेदम चोप

जेव्हा ही घटना घडली, लोकांनी लगेच त्या गाडीतील तरूणांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी गाडीतील इतर दोनजण पळून गेले होते. मात्र त्यावेळी एक तरूण लोकांच्या हाती लागला. लोकांनी या तरुणाला बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. तर जखमी झालेल्यांना लोकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यानंतर चिडलेल्या लोकांनी या गाडीची नासधूस केली, या गाडीच्या काचाही फोडल्या. पोलिसांनी आता तिघांनाही ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सध्या सुरू आहे. मात्र, पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्हची घटना ताजी असतानाच नागपूरमध्येही अशीच घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण असल्याचं बघायला मिळतंय.

अधिक वाचा  नगराध्यक्षांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत आनंदाची बातमी, सदस्यत्व व मताधिकार सरकार हा अध्यादेश काढणार