भाजपमध्ये अस्वस्थता महाराष्ट्र, कर्नाटक, हरयाणा, राजस्थानमध्ये कमी जागाचा अंदाज; भाजपाचा प्लॅन चेंज

0

पश्चिम बंगाल, ओडिशानंतर आता दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आशा वाढल्या आहेत. महाराष्ट्रासारख्या काही राज्यांमध्ये जागांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी भाजपने आता उत्तर प्रदेशमध्ये आपली सर्व ताकद पणाला लावली आहे.अब की बार ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला लोकसभा निवडणुकीत काही राज्यांमध्ये फटका बसत आहे. काही राज्यांमध्ये जागा कमी होणार असल्याचे अहवाल आल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. ३७० जागा येतील की ३०० पेक्षा कमी जागा येतील? स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असणारा जादुई आकडा २७२ पर्यंत जाईल की, २५० पर्यंतच जागा जिंकता येतील या प्रश्नांनी भाजप नेत्यांना छळले आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

...येथे आनंदाची बातमी

– पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये किती जागा वाढणार हे निश्चित आहे. मात्र आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून भाजपासाठी आनंदाची बातमी आली आहे.

– आंध्र प्रदेशात भाजपचा नवा सहकारी तेलुगू देसम पक्ष चांगली कामगिरी करत आहे आणि भाजपलाही त्याच्याशी युती केल्याचा फायदा होत आहे. आंध्रमध्ये भाजप दोन ते तीन जागा जिंकू शकतो, असा अंदाज आहे.

महाराष्ट्रामध्ये जागा कमी होणार?

– २०१९ च्या तुलनेत यावेळी भाजपला यावेळी २०२४ मध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, हरयाणा, राजस्थानमध्ये कमी जागा मिळण्याचा अंदाज आहे.

– ज्या राज्यांमध्ये भाजपच्या जागा वाढू शकतात, त्यामध्ये पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.उत्तर प्रदेशवर लक्ष केंद्रित

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

आता शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी भाजपने उत्तर प्रदेशात आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. नरेंद्र मोदी स्वतः वाराणसीत तळ ठोकून उत्तर प्रदेशातील १३ लोकसभा जागांवर आपले लक्ष केंद्रित करणार आहेत.

पंतप्रधान मोदींच्या आधीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उत्तर प्रदेशात पोहोचत असून, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना हिमाचल प्रदेश आणि पंजाबवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.

पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत उत्तर प्रदेशातच राहणार आहेत. १ जून रोजी अंतिम फेरीच्या मतदानासाठी ३० मे रोजी निवडणूक प्रचार संपणार आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

तेलंगणात किती जागा वाढणार?

– तेलंगणातून भाजपसाठी निवडणूक सर्वेक्षण करणारे नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी दावा केला आहे की, तेलंगणात भाजपच्या जागा चारवरून वाढत आठ ते दहा होऊ शकतात.

– राव हे भाजपचे राज्यसभा खासदार आहेत. आंध्र प्रदेशात टीडीपी १५ जागा जिंकू शकते असा त्यांचा दावा आहे.