शिखर बँक प्रकरणी अजित पवार यांना ‘क्लीनचीट’चा दिलासा; रोहित पवार आणि आमदार तनपुरेही क्लीन

0
4

शिखर बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्य सहकारी बँक (शिखर बँक) कथित घोटाळा प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्लीन चीट देण्यात यावी अशी शिफारस आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाकडे केली होती. याबाबतची बँकेला कोणताही आर्थिक नुकसान झालं नसून आत्ता पर्यंत १३४३.४१ कोटी रुपये वसूल करण्यात आल्याचा क्लोजर रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे.

अजित पवार यांच्याशी निगडित कोणत्याही व्यवहारात फौजदारी गुन्हा होत नसल्याचा निर्वाळा EOW चा क्लोजर रिपोर्टमध्ये केला आहे. क्लोजर रिपोर्टमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांना देखील क्लीन चिट मिळाली आहे.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

बँकेला कोणतही आर्थिक नुकसान झालं नसून आत्ता पर्यंत १३४३.४१ कोटी रुपये वसूल करण्यात आल्याचा दावा क्लोजर रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात दाखल करण्यात आलेल्या क्लोजर रिपोर्टचा तपशील आत्ता उघड करण्यात आला आहे. प्रक्रियेचं पालन न करता साखर कारखान्यांना कोट्यावधी रुपये दिल्याचा आरोप आहे. तसेच कारखाने एनपीए झाल्यानंतर ते नाममात्र किंमतीत बँकेच्या संचालकांच्या निकटवर्तीयांना विकल्याचा आरोप करण्यात आला होता. क्लोजर रिपोर्टवर अद्याप कोणताही निर्णय आलेला नाही.