सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अजित पवार दगडूशेठच्या मंदिरात

0

बारामतीमधील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार  आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी त्यांनी पुण्यातील श्रीमंत दगडशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत अजित पवार देखील उपस्थित होते. दोघांनी दगडूशेठ गणपतीचं आरती देखील केली. मोठा विजय होऊ दे, यासाठी गणरायाकडे साकडं घातलं, अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी दिली. तर निवडणुका चांगल्या वातावरणात पार पडाव्यात यासाठी गणपतीचे आशीर्वाद घेतले, असं अजित पवार म्हणाले. गणरायाने मला भरपूर दिले आहे. सगळ्यांचे भलं कर, असे देखील अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, चांगल्या वातावरणात पार पडाव्यात त्याकरता गणरायाचे आशीर्वाद घेतले. पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा मोदी बसत असताना महाराष्ट्राचा त्यामध्ये मोठा वाटा पाहिजे. महाराष्ट्रातून महायुतीचे उमेदावर लोकसभेला जास्तीत जास्त निवडून यावेत, अशी प्रार्थना देवाला केली आहे. आशिर्वाद घेतला असला तरी प्रत्येकाला काम करावे लागते, फिरावे लागते. जनतेचा विश्वास संपादन करावा लागतो. प्रत्येक पक्ष जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रयत्न करतील. शेवटी जनता जनार्दन श्रेष्ठ आहे. जनता जो निर्णय देईल तो मान्य करावा लागेल.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

जिथे महायुतीचे उमेदवार आहे तिथे अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री जाणार

पुण्यातील आज अर्ज आणि शक्तिप्रदर्शनाविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, शक्तिप्रदर्शन वगैरे काही नाही महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जायचे असे आम्ही ठरवले आहे. पुण्यात अर्ज भरल्यानंतर सातारा, सांगलीला जाणार आहे. फॉर्म भरला जाईल त्यानंतर सभा होईल.

रात्री उशीरापर्यंत बैठक
: अजित पवार

पुण्यातील विमान नगर परिसरातील हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात झाली बैठक. भाजपच्या कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांचे ताकदीने काम करण्याचं आव्हान केल्याची माहिती आहे. या विषयी बोलताना अजित पवार म्हणाले, रात्री उशीरापर्यंत बैठक झाली. भाजपचे महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून काही चर्चा केल्यात.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

ध चा म करु नका : अजित पवार

कालच्या ईव्हीएमच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, ध चा म करु नका. ती जाहीर सभा नव्हती. जाहीरनाम्यात पण काय करणार सांगितले जाते याचा अर्थ प्रलोभन दाखवले असे म्हणता येणार नाही. मी नेहमी आचारसंहितेमध्ये घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याची खबरदारी घेत असतो. उगाच कशाचाही बाऊ करु नका. राहुल गांधीच्या वक्तव्यानंतर मी वक्तव्य केले. फक्त मी थोडं ग्रामीण शैलीत वक्तव्य केले.